घर क्रीडा IPL 2023: गुजरातच्या गोलंदाजांची कमाल; मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव

IPL 2023: गुजरातच्या गोलंदाजांची कमाल; मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव

Subscribe

गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 208 धावांचं मजबूत आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 152 धावाच करता आल्या.

IPL च्या 16 व्या सीजनमध्ये 25 एप्रिलला 35 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये करण्यात आलं होतं. मुंबई इंडियन्सच्या नेतृत्त्वाची जबाबदारी ही रोहित शर्मा याच्याकडे होती. तर हार्दिक पांड्या गुजरात टायचन्सची कॅप्टन्सी करत होता. या सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सवर 55 धावांच्या फरकाने विजय मिळवला. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 208 धावांचं मजबूत आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 152 धावाच करता आल्या. ( IPL 2023 Maximum of Gujarat bowlers Massive defeat for Mumbai Indians )

विजयासाठी 208 धावांचं आव्हान असताना मुंबईच्या डावाला सुरुवातीपासूनच गळती लागली. मुंबईतर्फे नेहल वधेराने 21 चेंडूंत सर्वाधिक 40, तर कॅमेरुन ग्रीनने 26 चेंडूंत 3 षटकारांसह 33 धावांचे योगदान दिले. मात्र, त्यांचे हे प्रयत्न अगदीच तोकडे पडले. सुर्यकुमार यादव 12 चेंडूंत 23 धावांवर बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा 2 धावांवर बाद झाल्याने मुंबईची सर्वाधिक निराशा झाली. गुजरासतर्फे नूर अहमदने 37 धावांत 3, तर राशिद खान व मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

- Advertisement -

गुजरातने मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 207 धावांचा डोंगर रचला. शुभमनने सर्वाधिक 56, मिलरने 46, तर अभिनव मनोहरने 42 धावांचे योगदान दिले. सलामीवीर वृद्धिमान साहा 4 धावांवर अर्जुनच्या गोलंदाजीवर यष्टीमागे ईशान किशनकडे सोप झेल बाद झाला. या निर्णयावर त्याने डीआरएस घेतला होता, पण चेंडू ग्लोव्हजला स्पर्शून मागे गेल्याचं रिल्पेत स्पष्ट झालं. तिसऱ्या स्थानावर आलेला हार्दिक पांड्या स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर विजय शंकरदेखील 16 चेंडूंत 19 धावांवर बाद झाला. त्यानेही चावलाच्या गोलंदाजीवर टीम डेव्हिडकडे सोप झेल दिला.

( हेही वाचा: साक्षात ‘क्रिकेटचा देव’ भेटला अन् चिमुरडा चाहता झाला थक्क; सचिनची ‘ही’ अनोखी भेट होतेय व्हायरल )

- Advertisement -

विजय शंकर बाद झाला तेव्हा गुजरातची 12.2 षटकांत 4 बाद 101 अशी स्थिती होती. त्यानंतर मात्र डेव्हिड मिलर व अभिनव मनोहर यांनी पाचव्या गड्यासाठी 71 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी स्वीकारली. मेरे़डिथने 19 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर अभिनवला लॉंगऑफवरील बेहरेनडॉर्फकडे झेल देणे भाग पाडत ही जोडी फोडली होती.

- Advertisment -