Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2023 : गौतम गंभीरची विराट कोहलीशी दुश्मनी अन् रोहित शर्माशी दोस्ती;...

IPL 2023 : गौतम गंभीरची विराट कोहलीशी दुश्मनी अन् रोहित शर्माशी दोस्ती; वाचा नेमके असं का?

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) आजचा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे फंलदाज, गोलंदाज चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने मैदानात उतरतील. मात्र हे खेळाडू आणि सामन्याचे झालं. परंतु, आजच्या सामन्यात सर्वांचे लक्ष गौतम गंभीर याच्याकडे आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) आजचा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे फंलदाज, गोलंदाज चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने मैदानात उतरतील. मात्र हे खेळाडू आणि सामन्याचे झालं. परंतु, आजच्या सामन्यात सर्वांचे लक्ष गौतम गंभीर याच्याकडे आहे. कारण मागील सामन्यात बंगळुरू संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यासोबत त्याचा वाद पाहायला मिळाला होता. पण या सामन्यात गौतम गंभीर आणि रोहित शर्माची दोस्ती पाहायला मिळणार आहे. (ipl 2023 mi vs lsg gautam gambhir and rohit sharma hug each other after clash with virat kohli ipl 2023 watch video)

सध्या आयपीएलच्या मैदानात गौतम गंभीर भारतीय संघाचा कर्णधार आणि धमाकेदार सलामीवीर रोहित शर्माला कडकडून मिठी मारताना दिसत आहे. तसेच, लखनऊने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला “वेलकम टू लखनऊ, रोहित”, असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. दरम्यान, आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मेनटॉर गौतम गंभीर विराट कोहली याच्याशी झालेल्या बाचाबाचीमुळे अजुनही चर्चेत आहे.

- Advertisement -

रोहित आणि गंभीरची भेट लखनऊमध्ये एकाना अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये झाली. आज संध्याकाळी मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगणार आहे. त्यानिमित्त मुंबईचा संपूर्ण संघ लखनऊमध्ये दाखल झाला. त्याचवेळी नेहमीच गंभीर असणाऱ्या गौतमने यावेळी मात्र रोहितचे आपल्या चेहऱ्यावरच्या गोड स्माईलने स्वागत केले.

- Advertisement -

व्हिडीओमध्ये गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यातील बॉन्डिंग दिसून येत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर मोठे हास्य आहे. 24 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये बॅकग्राउंडला एक सॉफ्ट गाणेही वाजत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट झाला आणि काही वेळातच तो व्हायरल झाला. व्हिडीओवर काही वेळातच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. गंभीर आणि रोहितच्या या बॉन्डचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. पण भविष्यात भूतकाळ डोकावला नाही, तर मग काय बोलायचे…. काहीजण विराटसोबत झालेली बाचाबाची आणि रोहितसोबतची ही गळाभेट या दोन्ही घटनांची सांगड घालत आहेत.

2007 आणि 2011च्या वर्ल्डकपच्या विजेत्या संघाचा भाग असलेल्या गौतम गंभीरचे महेंद्रसिंह धोनीसोबतचे मतभेद जगजाहीर आहेत. पण, युवराज सिंह, हरभजन सिंह, जहीर खान हे भारतीय संघाचे माजी खेळाडू आजही त्याचे जिगरी आहेत.


हेही वाचा – निर्णय लवकर घेणार परंतु घाई करणार नाही; राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं

- Advertisment -