घरक्रीडाPBKS vs DC : पंजाबचा विजय झाल्यास मुंबईला बसू शकतो मोठा फटका;...

PBKS vs DC : पंजाबचा विजय झाल्यास मुंबईला बसू शकतो मोठा फटका; वाचा सविस्तर

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL २०२३) सध्या सुरू असलेले सामने निर्णायक ठरत आहे. एखादा संघ विजयी झाल्यास किंवा पराभव झाल्यास त्याचा फायदा दुसऱ्याच संघाला होणार आहे. असे रोमांचक सामने सध्या क्रिकेटच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. मात्र असे असले तरी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण पंजाब किंग्स (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात आजचा सामना रंगणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL २०२३) सध्या सुरू असलेले सामने निर्णायक ठरत आहे. एखादा संघ विजयी झाल्यास किंवा पराभव झाल्यास त्याचा फायदा दुसऱ्याच संघाला होणार आहे. असे रोमांचक सामने सध्या क्रिकेटच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. मात्र असे असले तरी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण पंजाब किंग्स (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात आजचा सामना रंगणार आहे. या सामन्यात पंजाबचा विजय झाल्यास मुंबईचा संघ थेट अव्वल चार संघांच्या बाहेर होऊ शकतो. गुणतालिकेतील अव्वल चार संघ हे प्ले ऑफमध्ये खेळू शकतात. (IPL 2023 mumbai indians big blow punjab kings victory top 4 pbks vs dc)

लखनऊच्या सामन्यापूर्वी मुंबईचा संघ १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. पण या सामन्यात त्यांचा पराभव झाला आणि लखनऊने २ गुणांची कमाई केली. लखनऊचा संघ यापूर्वी चौथ्या स्थानावर होता. विजयासह त्यांनी मुंबईच्या संघाला धक्का दिला आणि त्यांनी तिसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाची आता चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. पंजाबचा संघ हा सध्याच्या घडीला १२ गुणांसह आठव्या स्थानावर आहे आणि अजून त्यांचे दोन सामने शिल्लक आहे.

- Advertisement -

पंजाबने आजचा सामना जिंकला तर, त्यांना दोन गुण कमावता येतील. या दोन गुणांसह पंजाबच्या संघाचे १४ गुण होतील, जेवढे मुंबईच्या संघाचेच आहेत. त्यामुळे जर पंजाबने मोठ्या फरकाने सामना जिंकला तर त्यांना दोन गुण तर मिळतील, पण त्याचबरोबर त्यांचा रनरेट सुधारेल आणि ते चौथ्या स्थानावर विराजमान होतील. त्यामुळे मुंबईचा संघ टॉप-४ च्या बाहेर जाईल आणि ते पाचव्या स्थानावर पोहोचतील.

मुंबईचा आता एकच सामना शिल्लक आहे. कोणत्याही परीस्थिती मुंबईला हा सामना जिंकणे बंधनकारक आहे. मुंबईने हा सामना जिंकला तर १६ गुण होतील. पण १६ गुणांसह त्यांचे प्ले ऑफमधील स्थान निश्चित होऊ शकत नाही. त्यामुळे मुंबईच्या संघाने जरी अखेरच्या सामन्यांत विजय मिळवला तरी त्यांना अन्य संघांची कशी कामगिरी होते, हे पाहावे लागेल. त्यामुळे अखेरचा सामना जिंकणे आणि अन्य संघाची कामगिरी यावर मुंबईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो.

- Advertisement -

हेही वाचा – IND vs PAK मालिकेसाठी पाकिस्तानने सुचवली ‘या’ देशांची नावे; BCCI ने दिले उत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -