घरक्रीडाIPL 2023 : नोबॉल हैदराबादच्या पथ्यावर; राजस्थानचा 4 विकेट्सने पराभव

IPL 2023 : नोबॉल हैदराबादच्या पथ्यावर; राजस्थानचा 4 विकेट्सने पराभव

Subscribe

नवी दिल्ली : अखेरच्या चेंडूवर विजयासाठी पाच धावांची गरज असताना संदीप शर्माने नो बॉल फेकला आणि तो हैदराबादच्या पथ्यावर पडला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर अब्दुल समदने (Abdul Samad) षटकार खेचत हैदराबादला विजय मिळवून दिला. त्यामुळे युजवेंद्र चहलच्या चार विकेट आणि जोस बटलर, संजू सॅमसनची वादळी खेळी व्यर्थ ठरली.

जयपूर सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या 52 व्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आमने सामने होते. या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेतला. सलामीवीर यशस्वी जयस्वाल 18 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने चांगली खेळी करत 35 धावा करून बाद झाला. त्यानंतर सलामीवीर जोस बटलर आणि संजू सॅमसन यांनी तुफानी पारी खेळत 57 चेंडूत 138 धावांचा पाऊस पाडला. यावेळी जोस बटलर आपले शतक पूर्ण अयशस्वी ठरला. त्याने 59 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 95 धावांची खेळी केली. याशिवाय संजू सॅमसनने 38 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 66 धावांची खेळी केली त्यामुळे राजस्थान संघाने हैदराबाद समोर 214 धावांचा डोंगर उभा केला. यावेळी हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि मार्को जॅन्सन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

- Advertisement -

राजस्थान मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना हैदराबादकडून सुरुवातीलाच दोन अर्धशतकी भागिदाऱ्या झाल्या. सलामीवीर अनमोलप्रीत सिंह 25 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने ३३ धावांचे योगदान देऊन बाद झाला. यानंतर राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागिदारी केली. यावेळी अभिषेक शर्मा 34 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ५५ धावा करून बाद झाला. यानंतर अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागिदारी केली. परंतु क्लासेन 12 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 26 धावाच करू शकला.

यानंतर राहुल त्रिपाठी 29 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 47 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर लगेचच कर्णधार एडन मार्करम 6 धावांवर बाद झाल्यामुळे हा सामना हैदराबादच्या हातून निसटला असे चित्र निर्माण झाले होते. पण ग्लेन फिलिप्स याने वादळी फलंदाजी केली. त्याने 7 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 25 धावांची खेळी केली. यानंतर अखेरच्या षटकात 17 धावांची गरज असताना त्याने नाबाद राहत 7 चेंडूत 17 धावांचे योगदान देताना हैदराबाद संघाला 4 विकेट्सने विजय मिळवून दिला. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने भेदक मारा करताना 4 षटकात 29 धावा देत सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. याशिवाय आर अश्विन आणि कुलदीप यादवला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

- Advertisement -

शेवटचे नाट्यमय षटकार
शेवटच्या षटकात 17 धावांची गरज असताना अनुभवी संदीप शर्मा गोलंदाजी करण्यासाठी आला. तो पहिल्याच चेंडूवर अब्दुल समदचा झेल उडवण्यात यशस्वी ठरला. मात्र, ओबेद मेकॉयने झेल हा झेल टिपण्यात अयशस्वी ठरल्यामुळे पहिल्या चेंडूवर दोन धावा आल्या. यानंतर दुसऱ्या चेंडूवर समदने षटकार खेचत सामना रंगतदार बनवला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पुन्हा दोन धावा आल्यामुळे हैदराबादला शेवटच्या 3 चेंडूवर 7 धावांची गरज होती.

संदीप शर्माने चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर एकेरी धावा दिल्यामुळे शेवटच्या चेंडूवर हैदराबादला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज होती आणि संदीपने टाकलेल्या शेवटचा उत्कृष्ट चेंडू टाकत समद बाद केले आणि राजस्थानने विजयी जल्लोष सुरू केला. पण इतक्यात पंचांनी हा नोबॉल असल्याचे जाहीर केले. यामुळे हैदराबदच्या जीव भांड्यात पडला. यानंतर समदने विजयी षटकात खेचल्यामुळे राजस्थानच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या मनसुब्यांना मोठा धक्का बसला तर, या विजयामुळे हैदराबादने स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -