Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा Opening Ceremony : आजपासून IPLचा महासंग्राम; उद्घाटन सोहळ्याला अभिनेत्री रश्मिका मंदानासह 'या'...

Opening Ceremony : आजपासून IPLचा महासंग्राम; उद्घाटन सोहळ्याला अभिनेत्री रश्मिका मंदानासह ‘या’ कलाकारांची हजेरी

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16व्या पर्वाला आजपासून (31 मार्च) सुरुवात होत आहे. यंदाच्या सीझनचा पहिला सामना गतविजेता संघ गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात रंगणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16व्या पर्वाला आजपासून (31 मार्च) सुरुवात होत आहे. यंदाच्या सीझनचा पहिला सामना गतविजेता संघ गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात रंगणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी आयपीएलचा उद्घाटन सोहळा (Opening Ceremony) होणार आहे. सुमारे पाच वर्षानंतर आयपीएलला ओपनिंग सेरेमनीसह सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदा धूमधडाक्यात आयपीएलला सुरुवात होणार आहे. ओपनिंग सेरेमनीमध्ये अनेक बॉलिवूडच्या कलाकारांची हजेरी पाहायला मिळणार आहे. (ipl 2023 opening ceremony performers details and date time venue arijit singh rashmika mandanna)

यंदाच्या आयपीएलच्या उद्धाटन सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna), तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) आणि गायक अरिजित सिंह (Arijit Singh) परफॉर्म करणार आहेत. त्याशिवाय कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) देखील उद्घाटन समारंभात परफॉर्म करताना दिसणार आहेत.

- Advertisement -

या उद्धाटन सोहळ्याला संध्याकाळी 6:30 वाजता सुरूवात होणार आहे. तसेच, हा उद्घाटन सोहळा सुमारे 45 मिनिटे चालणार असून, त्यानंतर आयपीएल 2023च्या पहिल्या सामन्याला सुरूवात होणार आहे.

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन शेवटच्या वेळी 2018 मध्ये करण्यात आलं होतं. यानंतर, 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. 2020 मध्ये कोरोना महामारीमुळेही हा कार्यक्रम होऊ शकला नाही. यावेळी उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडच्या तडक्यासोबतच ड्रोन शोचंही आयोजन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, आयपीएलचा उद्धाटन सोहळा हा विशेष असल्याने सर्वांचेच त्याकडे लक्ष लागले आहे. कारण तब्बल पाचवर्षांनंतर हा उद्धाटन सोहळा पार पडणार आहे. शेवटचा उद्धाटन सोहळा हा 2018 मध्ये झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या सन्मानार्थ उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. 2020 च्या हंगामात, कोरोना महामारीमुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. यावेळच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडच्या फ्लेवरसोबतच ड्रोन शोचेही आयोजन करण्यात येणार आहे.

IPL 2023 : उद्घाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण येथे पाहा?

आयपीएलच्या 2023 उद्घाटन समारंभाचं थेट प्रक्षेपण (Live Streaming) तुम्हाला पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला लाईव्ह स्ट्रिमिंगवर पाहता येईल, जिओ सिनेमा अॅपवर तुम्ही हा सोहळा लाईव्ह पाहू शकता.


हेही वाचा – विराट कोहलीने डिलीट केला १०वीच्या मार्कशीटचा फोटो, कॅप्शनसहीत फोटोही व्हायरल

- Advertisment -