Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2023 : आतापर्यंतच्या सामन्यांनंतर ऑरेन्ज, पर्पल कॅप कुणाकडे? वाचा सविस्तर

IPL 2023 : आतापर्यंतच्या सामन्यांनंतर ऑरेन्ज, पर्पल कॅप कुणाकडे? वाचा सविस्तर

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16 हंगामातील अर्ध्याहून अधिक सामने झाले असून काही दिवसांवरच अंतिम सामना होणार आहे. या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी आयपीएलमधील सर्वच संघ प्रयत्न करत आहेत. एकिकडे संघाची कामगिरी तर दुसरीकडे खेळाडूंची कामगिरी पाहायला मिळत आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16 हंगामातील अर्ध्याहून अधिक सामने झाले असून काही दिवसांवरच अंतिम सामना होणार आहे. या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी आयपीएलमधील सर्वच संघ प्रयत्न करत आहेत. एकिकडे संघाची कामगिरी तर दुसरीकडे खेळाडूंची कामगिरी पाहायला मिळत आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांनंतर आयपीएलमध्ये प्रसिद्ध असलेल्या ऑरेन्ज, पर्पल कॅपची चर्चा सुरू झाली आहे. कोणत्या फलंदाजाकडे ऑरेन्ज कॅप आहे? आणि कोणत्या गोलंदाजाकडे पर्पल कॅप आहे? या चर्चांना काल झालेल्या दोन सामन्यांपासून उधाण आले आहे. (Ipl 2023 orange cap purple cap most runs wicket taker score card faf du plessis rashid khan)

आयपीएलमध्ये रविवारी 14 मे रोजी डबल हेडरचा थरार रंगला. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स टीमला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून 112 धावांनी पराभूत व्हावे लागले. दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. या दोन्ही सामन्यांमुळे ऑरेन्ज आणि पर्पल कॅपमध्ये बदल होण्याची शक्यता होती. कारण ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत असलेले 4 पैकी 2 आणि स्वत: ऑरेन्ज कॅप होल्डर फाफ असे एकूण 3 खेळाडू या डबल हेडरमध्ये खेळले. त्यामुळे बदल अपेक्षित होता.

- Advertisement -

ऑरेन्ज कॅप आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याच्याकडे आहे. तर यशस्वी जयस्वाल आणि डेव्हॉन कॉनवे या तिघांना आपलं स्थान भक्कम करण्याची संधी होती. मात्र फाफने राजस्थान विरुद्ध 55 धावांची खेळी करत ऑरेन्ज कॅप आपल्याकडेच कायम ठेवली. तर डेव्हॉन कॉनवे याने 30 धावा केल्या. त्यामुळे कॉनवे थेट पाचव्यावरुन तिसऱ्या स्थानी आला. यामुळे मुंबई इंडियन्स संघाच्या सूर्यकुमार यादवची चौथ्या स्थानी घसरण झाली. त्यामुळे शुबमन गिल चौथ्यावरुन पाचव्या क्रमांकावर पोहचला.

ऑरेन्ज कॅप कोणाकडे?

- Advertisement -

संघाचे नाव                   फलंदाजाचे नाव              एकूण सामने        एकूण धावा      हायस्कोअर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु      फाफ डु प्लेसिस                 12                  631             84
राजस्थान रॉयल्स           यशस्वी जयस्वाल                 13                  575            124
चेन्नई सुपर किंग्स            डेव्हॉन कॉनव्हे                   13                  498             92*
मुंबई इंडियन्स               सूर्यकुमार यादव                 12                   479            103*
गुजरात टायटन्स             शुबमन गिल                     12                  475              94*

पर्पल कॅप कुणाकडे?

आता राजस्थान रॉयल्सच्या 3 विकेट्स घेत पुन्हा पर्पल कॅप मिळवण्याची संधी होती. तर तुषार देशपांडे यालाही पाचव्या स्थानावरुन वर येता आलं असतं. मात्र चहल तुषार दोघांपैकी एकालाही 1 विकेटही घेता आली नाही. त्यामुळे चहलवर याचा काही परिणाम झाला नाही.

संघाचे नाव                          गोलंदाजाचे नाव       एकूण सामने    एकूण विकेट्स     सर्वोत्तम कामगिरी
गुजरात टायटन्स                      राशिद खान              12              23                  30/4
राजस्थान रॉयल्स                     युझवेंद्र चहल            13              21                  17/4
मुंबई इंडियन्स                        पीयूष चावला            12              19                   22/3
गुजरात टायटन्स                      मोहम्मद शमी           12              19                   11/4
कोलकाता नाईट रायडर्स            वरुण चक्रवर्थी            13              19                   15/4


हेही वाचा – सूर्यकुमारने थर्ड मॅनला मारलेल्या षटकार विशेष; सचिन तेंडुकरकडून खास ट्वीट

- Advertisment -