Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL Playoffs : RCBच्या चाहत्यांच्या पदरी पुन्हा निराशा; मुंबईची प्लेऑफमध्ये एंट्री

IPL Playoffs : RCBच्या चाहत्यांच्या पदरी पुन्हा निराशा; मुंबईची प्लेऑफमध्ये एंट्री

Subscribe

IPL 2023 मधील शेवटचे डबल हेडर सामने रोमांचक ठरले. मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादचा पराभव केला. त्यानंतरच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभवाचा सामाना करावा लागला आहे. यामुळे मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफचं तिकीट मिळालं आहे. पराभवासह आरसीबी संघाचं IPL 2023 मधील आव्हानही संपुष्टात आलं आहे. यामुळे चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे.

IPL 2023 मधील शेवटचे डबल हेडर सामने रोमांचक ठरले. मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादचा पराभव केला. त्यानंतरच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभवाचा सामाना करावा लागला आहे. यामुळे मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफचं तिकीट मिळालं आहे. पराभवासह आरसीबी संघाचं IPL 2023 मधील आव्हानही संपुष्टात आलं आहे. यामुळे चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. ( IPL 2023 Playoffs RCB fans disappointed again Mumbai Indians entry into the playoffs )

IPL 2023 चा 70 वा सामना बंगळुरुच्या चिन्नस्वामी स्टेडिअमवर रॉयल बँगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगला होता. यासामन्यात सुरुवातील टॉस जिंकून गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स घालवून 197 धावा केल्या. यामध्ये आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएलमधील त्याचे 7 वे शतक ठोकले.

- Advertisement -

RCBकडून विजयासाठी 198 धावांचे आव्हान मिळाले असताना गुजरातच्या फलंदाजांनी मैदानावर जबरदस्त फलंदाजी केली. गुजरात टायटन्सकडून युवा स्टार खेळाडू शुभमनने आयपीएलमधईल त्याचे दुसरे शतक ठोकले. गुजरातने आरसीबीने दिलेलं आव्हान 6 विकेट्स आणि 5 चेंडू राखून पूर्ण केले. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे आरसीबीचे आयपीएल 2023 मधील आव्हान संपुष्टात आलं आहे.

कोहलीची शतकी खेळी व्यर्थ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं. विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. पण कोहलीची शतकी खेळी व्यर्थ ठरली. गुजरात टायटन्सकडून सलामीवीर शुभमन गिलने शानदार शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. शुभमन गिलने 52 चेंडूत नाबाद 104 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार मारले. शुभमन गिलशिवाय विजय शंकरने 35 चेंडूत 53 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक दोन गडी बाद केले. तर विजयकुमार वैशाक आणि हर्षल पटले यांना प्रत्येकी एक-एक गडी बाद करण्यात यश मिळाले.

- Advertisement -

- Advertisment -