घरक्रीडाIPL 2023 Prize Money: आयपीएल चॅम्पियन्सवर पैशांचा पाऊस, कुणाला किती रक्कम?

IPL 2023 Prize Money: आयपीएल चॅम्पियन्सवर पैशांचा पाऊस, कुणाला किती रक्कम?

Subscribe

आयपीएल २०२३ च्या (IPL 2023) १६ व्या हंगामातील शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK Vs GT) यांच्यात पार पडला. यावेळी चेन्नईच्या संघाने गुजरातच्या संघावर पाच विकेट्सने पराभव करत पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर आयपीएल चॅम्पियन्सवर (IPL Champions) पैशांचा पाऊस पडला आहे. पराभूत झालेल्या गुजरातच्या संघावरही कोट्यवधींची पाऊस पडला आहे.

जेतेपद जिंकल्यानंतर चेन्नईच्या संघाला २० कोटींचा धनादेश मिळालाय. तर हार्दिक पांड्याच्या संघालाही १२.५ कोटी मिळाले आहेत. तसेच गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सच्या (MI) संघाला ७ कोटी मिळाले आहेत. तर, लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) खात्यात साडेसहा कोटी जमा झाले.

- Advertisement -

या संपूर्ण हंगामात शुभमन गिलची (Shubman Gill) कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. त्याने या हंगामात एकूण चार बक्षीस पटकावली आहेत. सामनावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या डेव्हॉन कॉनवेला (Devon Conway) ५ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले तसेच यशस्वी जायस्वालला (Yashasvi Jaiswal) एमर्जिंग प्लेअरचा पुरस्कार देण्यात आला आहे.

कुणाला किती रक्कम?

ऑरेंज कॅप: शुभमन गिल- १० लाख रुपये

- Advertisement -

पर्पल कॅप: मोहम्मद शामी – १० लाख रुपये

एमर्जिंग प्लेअर : यशस्वी जैस्वाल – १० लाख रुपये

प्लेअर ऑफ द सीजन: शुभमन गिल- १० लाख रुपये

गेम चेंजर ऑफ द सीझन: शुभमम गिल – १० लाख रुपये

सर्वाधिक चौकार: शुभमन गिल- १० लाख रुपये

कॅच ऑफ द सीजन: राशीद खान- १० लाख रुपये

सर्वात लांब षटकार: फाफ डू प्लेसिस- १० लाख रुपये

सामनावीर (फायनल): डेवॉन कॉन्वे ५ लाख रुपये

सामना हरल्यानंतर काय म्हणाला हार्दिक पांड्या?

एक संघ म्हणून आम्ही सर्व काही बरोबर केलं. आम्ही मनापासून खेळलो. माझ्या संघानं या स्पर्धेत जो संघर्ष केला, त्याचा अभिमान आहे. आम्ही जिंकलो तरी एकत्र जिंकतो, आम्ही हरलो तरी एकत्र हरतो हे आमचं ब्रीदवाक्य आहे. मी इथं कोणतीही सबब सांगणार नाही. चेन्नईचा संघ उत्तम खेळला. त्याचं यश हे त्यांचंच आहे, असं हार्दिक म्हणाला.

गुजरात संघानं २० ओव्हर्समध्ये २१४ धावा केल्या होत्या आणि चेन्नईला जिंकण्यासाठी २१५ धावांची गरज होती. पण सामना चालू असताना पाऊस धो धो बरसला आणि तीन तासांचा खेळ वाया गेला. पंचांनी देखील दोन ते तीन वेळा खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. सामन्याला दुसऱ्या दिवशी १२ वाजून १० मिनिटांनी सुरूवात झाली. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार, चेन्नईला नवीन टार्गेट देण्यात आलं. यावेळी चेन्नईला १७१ धावांचं आव्हान देण्यात आलं आणि हे आव्हानं संघानं पूर्ण केलं.


हेही वाचा : CSK vs GT, IPL 2023 : शेवटच्या २ चेंडूत जडेजाने चालवली तलवार, गुजरातला चारली धूळ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -