घरक्रीडाIPL 2023 : शिखर धवन पंजाब किंग्ज संघाचा नवा कर्णधार

IPL 2023 : शिखर धवन पंजाब किंग्ज संघाचा नवा कर्णधार

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अगामी हंगामापूर्वी पंजाब किंग्सने संघात मोठा बदल केला आहे. सलामी फलंदाज शिखर धवनकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. मयांक अग्रवाल याला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. पंजाब किंग्सनं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. (ipl 2023 shikhar dhawan announced as captain of punjab kings)

पंजाब किंग्स संघाने आयपीएल 2023च्या आधी शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे. मयांक अग्रवालच्या तुलनेत शिखर धवनकडे कर्णधारपदाचा अनुभव जास्त आहे. त्यामुळे पंजाबने शिखर धवनकडे संघाची धुरा सोपवली आहे. आयपीएल 2022मध्ये सलामीवीर शिखर धवन याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यावर पंजाबच्या संघाच्या निवडकर्त्यांमध्ये चर्चा झाली होती. मात्र, शिखर धवनला कर्णधार न करता मयांक अग्रवालकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते.

- Advertisement -

पंजाब संघाची धुरा मयांक अग्रवालकडो सोपवल्यानंतर मागील आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वातखाली पंजाब संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. पंजाबचा संघ ग्रुप स्टेजमध्येही बाहेर गेला होता. त्यामुळे आयपीएल 2023साठी पंजाबने शिखर धवनकडे संघाची धुरा सोपवली आहे.

आयपीएल 2022मध्ये शिखर धवनने 14 सामन्यात 38च्या सरासरीने 460 धावा केल्या होत्या. पंजाबकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये शिखर पहिल्या क्रमांकावर होता. या हंगामात त्याने 3 अर्धशतके झळकावली होती. धवनच्या तुलनेत मयांक अग्रवालला चांगली कामगिरी करता आली नव्हती. मयांकने 12 डावात 16 च्या खराब सरासरीनं फक्त 196 धावा केल्या होत्या. तसेच, मयांकने एकच अर्धशतक केले होते.

- Advertisement -

पंजाब किंग्सचा संघ

  • मयांक अगरवाल (12 कोटी)
  • अर्शदीप सिंह (4 कोटी)
  • शिखर धवन (8.25 कोटी)
  • कागिसो रबाडा (9.25 कोटी)
  • जॉनी बेअरस्टो (6.75 कोटी)
  • शाहरुख खान (9 कोटी)
  • राहुल चहर (5.25 कोटी)
  • हरप्रीत ब्रार (3.8 कोटी)
  • प्रभसिमरन सिंह (60 लाख)
  • जितेश शर्मा (20 लाख)
  • इशान पोरेल (25 लाख)
  • लियाम लिव्हिंगस्टोन (11.5 कोटी)
  • ओडियन स्मिथ (6 कोटी)
  • संदीप शर्मा (50 लाख)
  • राज बावा (2 कोटी)
  • ऋषी धवन (55 लाख)
  • प्रेरक मंकड (20 लाख)
  • वैभव अरोरा (2 कोटी)
  • आर. चॅटर्जी (20 लाख)
  • बलतेज सिंह (20 लाख)
  • अंश पटेल (20 लाख)
  • नॅथन एलिस (75 लाख)
  • अथर्व तायडे (20 लाख)
  • बेनी हॉवेल (40 लाख)
  • भानुका राजपक्षे (50 लाख)

हेही वाचा – IND vs BAN : सामना न खेळताच ‘या’ खेळाडूने जिंकली चाहत्यांची मनं

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -