घरक्रीडाIPL 2023 : उद्यापासून IPLचा थरार ; गुजरात टायटन्स आणि चेन्नई...

IPL 2023 : उद्यापासून IPLचा थरार ; गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज येणार आमनेसामने

Subscribe

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या 16व्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. यावेळी पहिला सामना गेल्या वर्षी नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्स  (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात होणार आहे.

आयपीएलच्या 16व्या हंगामाचे वेळापत्रक 17 फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आले होते. यावेळी 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून या हंगामात एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्स संघाने अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने पहिल्याच प्रयत्नात आयपीएलचे जेतेपद पटकावले होते.

- Advertisement -

आयपीएल 2023 च्या 10 संघांची ए आणि बी गटात विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या गटात मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांना स्थान देण्यात आले आहे, तर दुसऱ्या गटात चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिला सामना उद्या (31 मार्च) चेन्नई आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.

या शहरात होणार सामने
आयपीएल 2023 च्या १६ व्या हंगामात अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला या शहरात सामने होणार आहेत. दोन्ही गटातील पहिले चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. या हंगामात 18 सामने दुहेरी हेडर होणार आहेत. एक संघ 14 सामने खेळणार असून 7 सामने घरच्या मैदानावर आणि 7 सामने विरोधी संघाच्या मैदानावर होणार आहेत. या हंगामात एकूण 74 सामने होणार असून 10 संघांमध्ये लीग टप्प्यातील 70 सामने होतील, तर उर्वरीत 4 सामने प्लेऑफचे असतील.

- Advertisement -

या हंगामातील पहिले पाच सामने
३१ मार्च – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स
१ एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
१ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
२ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स

वाईड आणि नो बॉलसाठी नवा नियम (New rule for wide and no ball)
आयपीएल 2023 मध्ये बीसीसीआयने वाईड आणि नो बॉलसाठी रिव्ह्यू सिस्टम घेऊन येणार आहे. या नियमाचा सर्वाधिक फायदा फलंदाजाला होणार आहे. कारण या नियमामुळे अटीतटीच्या सामन्यात निकाल कोणत्याही संघाच्या बाजूने लागू शकतो. त्यामुळे कोणत्याही संघाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

१६ व्या हंगामासाठी ‘हे’ करणार समालोचन
इंग्लिश समालोचक – ख्रिस गेल, एबी डिविलियर्स, ऑयन मॉर्गन, ब्रेट ली, ग्रीम स्वान, ग्रॅमी स्मिथ, स्कॉट स्टायरीस, संजना गणेशन, सुप्रिया सिंग, सुहेल चाडोक, सुहेल चाडोक.
हिंदी समालोचक – ओवैस शाह, झहीर खान, सुरेश रैना, अनिल कुंबळे, रॉबीन उथप्पा, पार्थिव पटेल, आरपी सिंग, प्रज्ञान ओझा, आकाश चोप्रा, निखील चोप्रा, सबा करीम, अनंत त्यागी, रिधिमा पाठक, सुरभी वैध, ग्लेन साल्दान्हा.
मराठी समालोचक – केदार जाधव, धवल कुलकर्णी, किरण मोरे, सिद्धेश लाड, प्रसन्ना संत, प्रसन्न संत, चैतन्य संत, कुणाल दाते, विकत पाटील, पूर्वी भावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -