घरक्रीडाIPL 2023 : विजयामुळे मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानी; मात्र बेंगळुरूच्या अडचणी वाढू शकतात

IPL 2023 : विजयामुळे मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानी; मात्र बेंगळुरूच्या अडचणी वाढू शकतात

Subscribe

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) मंगळवारी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) 6 विकेट्सने पराभव केला आणि तिसऱ्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे मुंबईच्या प्लेऑफ पोहचण्याचा मार्ग सुकर झाला आहे. परंतु बंगळुरू संघाच्या अडचणी वाढू शकतात.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या 54 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरू संघाने 200 धावांचे आव्हान 16.3 षटकातच पूर्ण केले. यावेळी सूर्यकुमार यादवने 35 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 83 धावांची खेळी केली. त्यांच्यासोबत नेहल वढेरा याने अर्धशतकी खेळी करताना 34 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या, तर इशान किशन याने 21 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 42 धावांची केली. या विजयासह मुंबईने पाच स्थानांची झेप घेऊन तिसऱ्या स्थानी पोहचले आहेत. त्यामुळे मुंबईने उर्वरित सर्व सामने जिंकले तर ते थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.

- Advertisement -

मुंबई आता राजस्थान, हैदराबाद आणि गुजरातविरुद्धचे सामने खेळायचे आहेत. हे सर्व सामने मुंबईला जिंकावे लागतील आणि आपला रनरेटही इतर संघापेक्षा चांगला ठेवावा लागेल. कारण मुंबई आता तिसऱ्या क्रमांकावर असली तरी त्यांच्या रनरेट -0.255 एवढा आहे. त्यामुळे मुंबईला उर्वरीत 3 सामन्यांपैकी एकही सामना गमावला तर त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. त्याचवेळी दोन किंवा अधिक सामने गमावल्यास आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागेल.

बेंगळुरूच्या अडचणी वाढू शकतात
मुंबई विरुद्धच्या पराभवामुळे बेंगळुरूच्या अडचणी वाढू शकतात. कारण आरसीबी -0.079 रनरेटसह सातव्या क्रमांकावर आहे. बेंगळुरूला आता राजस्थान, हैदराबाद आणि गुजरातविरुद्ध ३ सामने खेळायचे आहेत. हे तिन्ही सामने चांगल्या रनरेटने जिंकावे लागतील. परंतु 2 सामने गमावल्यास बेंगळुरूला प्लेऑफमधून बाहेर पडावे लागेल.

- Advertisement -

गुजरात अव्वल स्थानी
गुजरात टायटन्स सध्या 11 सामन्यांतून 8 विजय मिळवून 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे त्यांना उर्वरित ३ सामन्यांपैकी फक्त एका विजयाची गरज आहे. मात्र गुजरातने तिन्ही सामने मोठ्या फरकाने गमावले, तर त्यांच्या रनरेटवर फरक पडू शकतो आणि त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -