घरक्रीडाIPLमधून बाहेर होताच, विराट कोहली झाला भावूक म्हणाला, पुढच्या हंगामासाठी...

IPLमधून बाहेर होताच, विराट कोहली झाला भावूक म्हणाला, पुढच्या हंगामासाठी…

Subscribe

आयपीएलच्या प्लेऑफमधून बाहेर झाल्यानंतर कोहलीने ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी किंग कोहलीने आपल्या ट्विटमध्ये ते क्षण आठवले ज्यामध्ये संघाने चांगली कामगिरी केली. याशिवाय कोहलीने त्याच्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत.

गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबी पुन्हा एकदा आयपीएलच्या प्लेऑफमधून बाहेर पडला. आयपीएलचे जेतेपद पटकावण्याचे कोहलीचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. आयपीएलच्या प्लेऑफमधून बाहेर झाल्यानंतर कोहलीने ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी किंग कोहलीने आपल्या ट्विटमध्ये ते क्षण आठवले ज्यामध्ये संघाने चांगली कामगिरी केली. याशिवाय कोहलीने त्याच्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत. कोहलीचे हे ट्विट व्हायरल झाले आहे. कोहलीने आरसीबीच्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत. पण कोहलीने आपल्या ट्विटमध्ये अशा लोकांना फटकारले नाही ज्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये शुभमन गिलच्या बहिणीसाठी असभ्य शब्द वापरले आहेत. ( IPL 2023 Virat Kohli tweet Viral After RCB Out from IPL 2023 Royal Challengers Bangalore )

- Advertisement -

विराट कोहलीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘असा हंगाम ज्यामध्ये काही क्षण अविस्मरणीय होते पण दुर्दैवाने आम्हाला लक्ष्य गाठता आलं नाही. आम्ही निराश झालो, पण आम्हाला डोकं उंच ठेवून पुढच्या हंगामासाठी तयारी करावी लागेल. पण आमच्या समर्थकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. प्रशिक्षक, व्यवस्थापन आणि माझ्या सहकाऱ्यांचे खूप खूप आभार. पुढच्या मोसमात जोरदार पुनरागमन करणे हे आमचे पुढील लक्ष्य आहे, असं ट्वीट कोहलीने केलं आहे.

विराट कोहलीने आयपीएलच्या या मोसमात शानदार कामगिरी केली. कोहलीने 14 सामन्यात 2 शतकांसह 639 धावा केल्या. कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. इतकंच नाही तर गुजरात टायटन्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात किंग कोहलीच्या बॅटने शतकही झळकावलं होतं, तर दुसरीकडे गुजरातकडून शुभमन गिलनं शतक झळकावून सामन्याचं चित्रच फिरवलं होतं.

- Advertisement -

( हेही वाचा: IPL 2023: विराट कोहली RCB सोडून ‘या’ संघात जाणार? माजी खेळाडूने दिला सल्ला )

कोहलीसाठी हा मोसम विलक्षण ठरला आहे. या हंगामात किंग कोहलीने 2016 च्या मोसमात ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती त्याच पद्धतीने फलंदाजी केली. कोहलीने IPL 2016 मध्ये 973 धावा केल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -