घरक्रीडाIPL 2023 : आजच्या सामन्यावर पावसाचे संकट; लखनऊ-आरसीबी सामना रद्द होण्याची शक्यता

IPL 2023 : आजच्या सामन्यावर पावसाचे संकट; लखनऊ-आरसीबी सामना रद्द होण्याची शक्यता

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. मात्र या समान्यावर पावसाचे संकट असल्याची माहिती समोर येत आहे. कारण सोमवारी सकाळपासून लखनऊमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. मात्र या समान्यावर पावसाचे संकट असल्याची माहिती समोर येत आहे. कारण सोमवारी सकाळपासून लखनऊमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत सामना होण्याची शक्यता फारच कमी आहे. (IPL 2023 Weather Report Will Lucknow Rain Play Spoilsport To Blockbuster LSG VS RCB Clash)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. मात्र, लखनऊमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार रात्री 10 वाजेपर्यंत पावसाची शक्यता आहे.

- Advertisement -

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे. लखनऊचा संघ 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच, बंगळुरूचा संघ 8 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ हा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत.

आयपीएलच्या चालू हंगामात दोन्ही संघांमध्ये दुसऱ्यांदा सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात लखनौने आरसीबीचा 1 गडी राखून पराभव केला. या रोमांचक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. अशा स्थितीत गेल्या काही सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारी बंगळुरू मागील पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असेल.

- Advertisement -

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने या हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाला 4 विजय आणि 4 पराभव पत्करावे लागले आहेत. त्याचवेळी, लखनऊ सुपर जायंट्स संघाने खेळलेल्या 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तसेच, 3 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.


हेही वाचा – WTC 2023 : भारतीय संघाला तिसरा धक्का; बुमराह श्रेयसनंतर ‘हा’ अनुभवी गोलंदाज बाहेर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -