घरक्रीडाIPL 2024: IPL लिलावासाठी 1166 खेळाडूंची नोंदणी; मिचेल स्टार्कचाही समावेश

IPL 2024: IPL लिलावासाठी 1166 खेळाडूंची नोंदणी; मिचेल स्टार्कचाही समावेश

Subscribe

नवी दिल्ली: IPL 2024 साठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी होणार आहे. लिलावासाठी खेळाडूंना 30 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी होती. शुक्रवारी आयपीएल फ्रँचायझींसोबत शेअर केलेल्या रजिस्टरमध्ये एकूण 1,166 खेळाडूंचा समावेश आहे. क्रिकबझच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सने रिलिज केलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे नाव या यादीत नाही. आर्चर हा बऱ्याच दिवसांपासून अनफिट आहे. (IPL 2024 1166 players registered for IPL auction Including Mitchell Starc)

विश्वचषकात अनेक स्टार खेळाडूंच्या नावांचा समावेश

- Advertisement -

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करणारी अनेक मोठी नावे आयपीएल लिलावात दिसू शकतात. यामध्ये मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, डॅरिल मिशेल आणि रचिन रवींद्र यांच्या नावाचा समावेश आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क शेवटचा 2015 मध्ये आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. जोश हेझलवूडचे लीगमध्ये खेळणे साशंक आहे. त्याने नावही नोंदवले आहे. त्याला नुकतचं आरसीबीने रिलिज केलं होतं.

1,166 खेळाडूंपैकी 830 भारतीय खेळाडू आहेत, तर 336 परदेशी खेळाडू आहेत. या यादीत 212 कॅप्ड, 909 अनकॅप्ड आणि 45 सहयोगी देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे. 830 भारतीयांमध्ये वरुण आरोन, केएस भरत, केदार जाधव, सिद्धार्थ कौल, धवल कुलकर्णी, शिवम मावी, शाहबाज नदीम, करुण नायर, मनीष पांडे, हर्षल पटेल, चेतन साकारिया, मनदीप सिंग, बरिंदर स्रान शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, हनुमा विहारी, संदीप वारियर आणि उमेश यादव, असे 18 कॅप्ड खेळाडू आहेत.

- Advertisement -

कॅप्ड भारतीयांमध्ये, हर्षल पटेल, केदार जाधव, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव या चार खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. उर्वरित 14 जणांना त्यांची बोली 50 लाख रुपयांपासून सुरू करायची आहे. बीसीसीआयने फ्रँचायझींना लिलावात समाविष्ट करणार्‍या खेळाडूंच्या यादीसह रजिस्टरला प्रतिसाद देण्याचे निर्देश दिले आहेत. फक्त 77 स्लॉट भरायचे आहेत, त्यापैकी जास्तीत जास्त 30 परदेशी खेळाडू असू शकतात.

(हेही वाचा: IND vs SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील मालिकेसाठी तीन वेगवेगळे कर्णधार; बीसीसीआयने कोणाला दिली संधी? )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -