घरक्रीडाIPL 2024 : अटीतटीच्या सामन्यात कोलकाताचा हैदराबादवर विजय

IPL 2024 : अटीतटीच्या सामन्यात कोलकाताचा हैदराबादवर विजय

Subscribe

शनिवारी संध्याकाळी कोलकाता आणि हैदराबाद या संघामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात कोलकाता संघाने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर 4 धावांनी हैदराबाद संघावर विजय मिळवला.

कोलकाता : IPL च्या सामन्यांना शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. आयपीएल 2024 चा पहिला सामना हा चेन्नई आणि बंगळुरु या दोन संघांमध्ये खेळवला गेला. त्यानंतर काल शनिवारपासून (ता. 23 मार्च) नियमित दोन सामन्यांना सुरुवात झाली आहे. काल संध्याकाळी कोलकाता आणि हैदराबाद या संघामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात कोलकाता संघाने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर 4 धावांनी हैदराबाद संघावर विजय मिळवला. काल झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात कोलकाता संघाने हैदराबादकडून हा विजय खेचून आणला. (IPL 2024: Kolkata win over Hyderabad in match)

हेही वाचा… DC VS PBKS : अटीतटीच्या सामन्यात पंजाबचा विजय; दिल्ली कॅपिटल्सचा 4 विकेट्सने पराभव

- Advertisement -

कोलकाताच्या ईडनबर्ग मैदानावर काल शनिवारी कोलकाता आणि हैदराबाद संघामध्ये सामना खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करत कोलकाता संघाने हैदराबादसमोर 209 धावांचे आव्हान उभे केले. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 204 धावा करण्यात यशस्वी झाला. अखेरीस कोलकाताच्या संघाने दणदणीत विजय मिळवत हैदराबादच्या संघाला पराभूत केले. आंद्रे रसेलच्या पहिल्या डावात षटकार-चौकारांच्या आतिषबाजीसह केलेल्या 64 धावा आणि दुसऱ्या डावात 2 विकेट्सही घेतले. पण हैदराबादच्या संघानेही काही हार नाही मानली. हेनरिक क्लासेनने डेथ ओव्हर्समध्ये षटकारांचा सिलसिला सुरू करत सामन्याचा रोख बदलला होता. पण कोलकाताला विजय मिळवण्यात यश आले.

कोलकाताने दिलेल्या डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करताना हैदराबादकडू इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अभिषेक शर्मा (32) आणि मयंक अग्रवाल (32) सलामीसाठी उतरले. या दोघांनीही संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण मोठी खेळी करू शकले नाहीत आणि हर्षित राणाच्या गोलंदाजीवर मयंक तर रसेलच्या गोलंदाजीवर अभिषेक बाद झाला. यानंतर राहुल त्रिपाठी (20) आणि एडन मारक्रम (18) यांनी बाद होण्यापू्र्वी धावांमध्ये योगदान दिले. त्यानंतर आलेला अब्दुल समद 15 धावा करत तंबूत परतला. पण हेनरिक क्लासेनने आंद्रे रसेलच्या 63 धावांच्या तोडीस तोड खेळी करत त्याने हैदराबादला सामन्यात कायम ठेवले. हेनरिकने अखेरच्या षटकात बाद होण्यापू्र्वी 29 चेंडूत 8 षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या. तर शाहबाज अहमदने 5 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या.

- Advertisement -

कोलकाताकडून देण्यात आलेल्या 209 धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने अटीतटीची लढत दिली. मात्र, शेवटच्या षटकांत हैदराबादला 6 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज असताना हर्षित राणाकडे गोलंदाजी सोपवली. शेवटचे षटक टाकताना पहिल्याच चेंडूवर क्लासेनने षटकार खेचला. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेत शाहबाजकडे स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूवर शाहबाज श्रेयस अय्यरकडून झेलबाद झाला. चौथ्या चेंडूवर नुकत्याच आलेल्या यान्सनने एक धाव घेत क्लासेनला स्ट्राईक दिली. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना क्लासेनकडे स्ट्राईक होती त्याने चेंडू हवेत लगावला खरा पण सुयश शर्मा याचा झेल घेत त्याला माघारी पाठवले. यानंतर हर्षित राणाने सहाव्या चेंडूवर एकही धाव न दिल्याने कोलकाताने 4 धावांनी हा अटीतटीचा सामना जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -