घरक्रीडाIPL 2024 : लखनऊ संघात मोठे फेरबदल; कृणाल पंड्याला उपकर्णधार पदावरून हटवले

IPL 2024 : लखनऊ संघात मोठे फेरबदल; कृणाल पंड्याला उपकर्णधार पदावरून हटवले

Subscribe

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल (IPL) च्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले असून पहिला सामना पुढील महिन्यात 22 मार्च रोजी होणार आहे. आयपीएल सुरू व्हायला महिना बाकी असतानाच आता लखनऊ सुपर जायंट्स संघात मोठे फेरबदल होताना दिसत आहेत. लखनऊ संघाने कृणाल पंड्याला उपकर्णधार पदावरून हटवले असून त्याच्याजागी वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आता आयपीएल सुरू झाल्यावर निकोलस पूरन निर्णय घेण्यासाठी कर्णधार केएल राहुलच्या मदतीला दिसून येणार आहे. (IPL 2024 Major changes in Lucknow team Krunal Pandya was removed from the post of vice captain)

हेही वाचा – Loksabha Election : भाजपा जिंकल्यावर लाकडे गोळा करावी लागतील; ममतांनी सांगितले कारण…

- Advertisement -

लखनऊ संघाने कृणाल पंड्याच्या जागी वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू निकोलस पूरनला आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी उपकर्णधार केले आहे. केएल राहुलने आज निकोलस पुरनला उपकर्णधाराची जर्सी दिली. निकोलसच्या जर्सीचा क्रमांक 29 आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो शेअर करताना लखनऊ संघाने कॅप्शनमध्ये लिहिले की, पूरणला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

हेही वाचा – Sharad Pawar : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पवारांकडून जेवणाचे निमंत्रण; अजितदादा जाणार? 

- Advertisement -

निकोलस पूरनची आयपीएल कारकीर्द

वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज निकोलस पूरन 2023 पासून लखनऊ सुपर जायंट्ससोबत आहे. याआधी तो पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सच्या संघात होता. लखनऊ संघाने पुरणला 16 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या शिबिरात समाविष्ट केले होते. त्याचवेळी, त्याला 2024 वर्षासाठी कायम ठेवण्यात आले. पुरणच्या क्रिकेट करिअरबद्दल बोलायचे झाले तर, निकोलसने वनडेमध्ये 61 सामने खेळताना 1983 धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये 88 सामने खेळताना 1848 धावा आणि आयपीएलमध्ये 62 सामने खेळताना त्याने 1270 धावा केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -