घरक्रीडाIPL 2024: मुंबई इंडियन्समध्ये बंड? रोहित आणि हार्दिकमधील लढाई चव्हाट्यावर, नेमकं काय...

IPL 2024: मुंबई इंडियन्समध्ये बंड? रोहित आणि हार्दिकमधील लढाई चव्हाट्यावर, नेमकं काय घडलं?

Subscribe

मुंबई: रोहित शर्मा. टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार. माजी कारण मुंबईने अलीकडेच हार्दिक पांड्याला आपला नवा कर्णधार म्हणून निवडले आहे. या निर्णयावर यापूर्वीही मोठा गदारोळ झाला होता आणि हे आता थांबणार नाही असे दिसते. आता या दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना ट्विटरवर अनफॉलो केलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्समधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय. खरं तर, मुंबईचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी अलीकडेच रोहितऐवजी पांड्याकडे कर्णधारपद का दिले हे सांगितले होते आणि रोहितची पत्नी रितिका हिने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. (IPL 2024 Mutiny in Mumbai Indians Rohit Sharma and Hardik Pandya fight they unfollowed each other on Social Media)

आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला संघाच्या कर्णधारपदी नियुक्त केल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. IPL 2024 साठी खेळाडूंच्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्समध्ये खरेदी करून सर्वांना आश्चर्यचकित केले. यानंतर काही दिवसांनी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्या कर्णधार बनल्याने गेल्या 10 हंगामात संघाचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले. याबाबत अनेक दिवस चर्चा सुरू होती. अलीकडेच हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला, जेव्हा मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाने फ्रेंचायझीच्या या निर्णयाबाबत स्पष्टीकरण दिले, पण यानंतर फ्रँचायझीच्या या निर्णयावर बरीच टीका झाली आणि रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने या मुद्द्यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिली. या घटनेनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा दोन्ही क्रिकेटपटूंनी एकमेकांना अनफॉलो केल्याचा दावा केला होता.

- Advertisement -

तथापि, या अफवांच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या विषयावर त्यांचे स्वतःचे दावे सादर केले आहेत. काही वापरकर्त्यांनी लिहिले की या दोन खेळाडूंनी कधीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो केले नाही, तर काहींनी लिहिले की, हार्दिक पांड्याने रोहित शर्माला अनफॉलो केले, रोहित शर्माने केलेले नाही.

पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सने डिसेंबरमध्ये घोषित केले होते की अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या लीगच्या 2024 आवृत्तीत संघाचे नेतृत्व करेल. हार्दिक पंड्याने IPL 2022 आणि IPL 2023 मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने लीगच्या पहिल्या आवृत्तीत विजेतेपद पटकावले. याशिवाय दुसऱ्या सत्रात अंतिम फेरी गाठण्यात संघाला यश आले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -