घरक्रीडाIPL 2024 Points Table: मुंबई इंडियन्सचा पॉइंट टेबलमध्ये धमाका; RCB अडचणीत

IPL 2024 Points Table: मुंबई इंडियन्सचा पॉइंट टेबलमध्ये धमाका; RCB अडचणीत

Subscribe

मुंबई इंडियन्सने आरसीबीला पराभूत करत वानखेडे स्टेडियममध्ये सलग आणि एकूण दुसरा विजय मिळवला आहे.

मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल 2024 मधील 25 व्या सामन्यानंतर, पॉइंट टेबलमध्ये थोडासा बदल झाला आहे. हंगामातील त्यांच्या सलग दुसऱ्या विजयासह, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील एमआयने वेग पकडण्यास सुरुवात केली आहे. मुंबईने आरसीबीचा 7 गडी राखून पराभव केला आणि सातव्या स्थानावर मजल मारली आहे. चार पराभवानंतर बेंगळुरू संघ 9व्या स्थानावर आहे. बेंगळुरूचा 6 सामन्यांमधला हा पाचवा पराभव आहे. सततच्या पराभवांमुळे त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशाही मावळत आहेत. (IPL 2024 Points Table Mumbai Indians is on seventh position and RCB on ninth position)

आयपीएल 2024 ची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी चांगली झाली नाही. मोसमातील पहिले तीन सामने गमावल्यानंतर संघाच्या क्षमतेवर आणि एकतेवर प्रश्न उपस्थित केले जात होते, पण संघ घरच्या मैदानावर वानखेडेवर पोहोचताच MI पुन्हा फॉर्ममध्ये आलं आणि आता MI 5 पैकी 2 सामने जिंकून 4 गुणांसह गुणतालिकेत 7 व्या स्थानावर आहे.

- Advertisement -

मुंबई इंडियन्सच्या खाली पंजाब किंग्ज 8 व्या, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 9व्या आणि दिल्ली कॅपिटल्स शेवटच्या स्थानावर आहेत.

कसा होता मुंबई विरुद्ध बंगळुरू सामना? (IPL 2024 Points Table)

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कर्णधार फाफ डुप्लेसिस, रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 196 धावा केल्या. यावेळी जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजी केली. सामना सुरू असताना RCB आणि MI मध्ये काटे की टक्कर असल्याचं दिसत होतं. मात्र, मुंबईचा डाव सुरू होताच चित्र बदललं आणि मुंबईने स्फोटक फलंदाजीच्या जोरावर सामना आपल्या खिशात घातला.

- Advertisement -

इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने अवघ्या 15.3 षटकांत ही धावसंख्या गाठली. सूर्याने 19 चेंडूत 52 धावा केल्या, तर किशनने 34 चेंडूत 69 धावांची शानदार खेळी केली.

(हेही वाचा: MI vs RCB Match : मुंबईचा सलग दुसरा विजय; बंगळुरूचा 7 गडी राखून पराभव)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -