घरक्रीडाIPL 2024 RCB vs LSG : लखनऊच्या मयांक यादवने वेगवान चेंडू टाकत...

IPL 2024 RCB vs LSG : लखनऊच्या मयांक यादवने वेगवान चेंडू टाकत स्वतःचाच मोडला विक्रम

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वातील 15 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात फलंदाजी करताना विराट कोहली व फॅफ डूप्लेसिस यांनी दमदार सुरुवात केली. पण, मणिमारन सिद्धार्थ व मयांक यादव या गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली.

बंगळुरू : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वातील 15 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात फलंदाजी करताना विराट कोहली व फॅफ डूप्लेसिस यांनी दमदार सुरुवात केली. पण, मणिमारन सिद्धार्थ व मयांक यादव या गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली. देवदत्त पडिक्कलच्या भन्नाट थ्रोवर फॅफ डूप्लेसिसला धावचीत करून माघारी पाठवले. विशेष म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये मयांक यादवने वेगवान चेंडू टाकत स्वतःचाच विक्रम मोडला आहे. (IPL 2024 RCB vs LSG mayank yadav bowled fastest delivery of this IPL 2024)

या सामन्यात 157 kmph च्या वेगाने चेंडू टाकत मयांक यादवने स्वत:चा रेकॉर्ड मोडला आहे. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूचे चार फलंदाज 52 धावांत तंबूत परतले. तर लखनऊ सुपर जायंट्सकडून फलंदाजी करताना क्विंटन डीकॉक आणि निकोलस पूरन यांच्या फटकेबाजीने लखनऊला 181 धावांपर्यंत पोहोचवले. शेवटच्या दोन षटकांत निकोलसने उत्तुंग फटकेबाजी केली. ग्लेन मॅक्सवेलने बंगळुरूला दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Indians Captain : रोहितला पुन्हा मुंबईचे कर्णधार करा; माजी खेळाडूची मागणी

क्विंटन डी कॉकने पहिल्या विकेटसाठी लोकेश राहुलसह 53 व तिसऱ्या विकेटसाठी मार्कस स्टॉयनिससह 56 धावांची भागीदारी केली. क्विंटनने या सामन्यात 56 चेंडूंत 8 चौकार व 5 षटकारांसह 81 धावांवर माघारी परतला. तसेच, पूरनने 21 चेंडूंत 1 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 40 धाव चोपल्या आणि लखनौला 5 बाद 181 धावांपर्यंत पोहोचवले.

- Advertisement -

दरम्यान, मयंक यादव दिल्लीसाठी अंडर-१४ आणि अंडर-१६ क्रिकेट कधीही खेळला नाही, परंतु दिवंगत तारक सिन्हा यांनी त्यांची प्रतिभा पाहिली आणि त्याला ‘राजधानी एक्सप्रेस’ बनण्यास मदत केली. तारक सिन्हा यांनी भारतीय क्रिकेटला ऋषभ पंतसारखा खेळाडू दिला आहे.


हेही वाचा – IPL Dates 2024 : आयपीएलच्या स्पर्धेत रंगत येताच 2 सामन्यांच्या तारीखेत बदल; वाचा सविस्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -