मुंबई: मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर हार्दिक पांड्याचा बॅड टाइम सुरू झाला असल्याचं दिसत आहे. IPL 2024 च्या पहिल्या सामन्यापासूनच प्रत्येक स्टेडियममध्ये हार्दिक पांड्याविरुद्ध फॅन्स आक्रमक झाले आहेत. तसंच, मुंबई इंडियन्स संघालाही सतत पराभवाचा सामना करावा लागत आहे. हार्दिक अहमदाबाद आणि हैदराबाद दरम्यानच्या वानखेडे स्टेडियमवर त्याच्या घरच्या मैदानावर उतरला. तिथेही चाहत्यांनी त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने चाहते सर्वाधिक संतापले आहेत. परंतु यावेळी हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ रोहित शर्माने असे काही केले की, आता सर्व स्तरावरून रोहित शर्माचे कौतुक केले जात आहे. (IPL 2024 Rohit Sharma backs Hardik Pandya urges fans not to dissuade Pandya watch video)
रोहितने चाहत्यांना केले शांत
वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक सुरू झाल्यापासूनच चाहते हार्दिक पांड्याला चिडवत होते. नाणेफेकीच्या वेळी संजय मांगरेकर यांनीही प्रेक्षकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षणादरम्यानही परिस्थिती बदलली नाही. हार्दिक पडद्यावर येताच चाहत्यांनी आरडाओरडा सुरू केला. अशा परिस्थितीत रोहित शर्माने प्रेक्षकांना शांत राहण्यास सांगितले. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना रोहितने प्रेक्षकांना दोन्ही हातांनी शांत राहण्याचे संकेत दिले.
हार्दिकला अच्छे दिन येणार का?
मुंबई इंडियन्सने सलग तिसरा सामना गमावला आहे. रोहित शर्माने आता चाहत्यांना शांत राहण्यास सांगितले आहे. अशा परिस्थितीत आगामी सामन्यांमध्ये चाहते हार्दिक पांड्याला वेठीस धरणार नाहीत, अशी अपेक्षा केली जाऊ शकते. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या फलंदाजीत हार्दिकने निश्चितच काही चांगले शॉट्स खेळले. यावेळी चाहत्यांनीही त्याला साथ दिली. पण त्यानंतर त्याने मैदानात कॅच सोडल्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर जोरदार टीका सुरू केली
लेगस्पिनर युझवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांच्या भेदक गोलंदाजीनंतर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून पराभव केला आणि रायन परागच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सलग तिसरा विजय नोंदवला. मुंबईच्या 126 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल्सने परागच्या अर्धशतकाच्या (39 चेंडूंत नाबाद 54, पाच चौकार, तीन षटकार) 15.3 षटकांत चार गडी गमावून 127 धावा करून विजय मिळवला. आकाश मधवालने 20 धावांत तीन बळी घेतले मात्र मुंबईला पराभवापासून वाचवता आला नाही.
These 11th failed Chokli fans 😭 https://t.co/P5Jl9UXYJQ pic.twitter.com/VASirrltfZ
— Berlin (@BlueandGoldAura) April 1, 2024
(हेही वाचा: IPL: फेक वेबसाइटवरून विकत होते IPL तिकिट्स; पोलिसांकडून टोळी गजाआड )