घरक्रीडाIPL 2024 Schedule : पहिल्या 21 सामन्यांचे 'असे' आहे वेळापत्रक

IPL 2024 Schedule : पहिल्या 21 सामन्यांचे ‘असे’ आहे वेळापत्रक

Subscribe

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल (IPL) च्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक आज (22 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आले आहे. पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले असून गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उद्घाटनाचा सामना होणार आहे.  (IPL 2024 Schedule The bugle has sounded the schedule for the first 21 matches has been announced)

हेही वाचा – Ranji Trophy 2024: रणजी ट्रॉफी जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला 1 कोटीसह बीएमडब्ल्यू कार; कुणाची घोषणा वाचा

- Advertisement -

चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उद्घाटनाचा सामना 22 मार्च रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. विशेष म्हणजे चेन्नईचा संघ विक्रमी नवव्यांदा आयपीएलच्या कोणत्याही मोसमातील पहिला सामना खेळणार आहे. यापूर्वी, संघाने 2009, 2011, 2012, 2018, 2019, 2020, 2022 आणि 2023 मध्ये उद्घाटन सामना खेळला आहे.

- Advertisement -

सध्या महिला प्रीमियर लीग सुरू असून या लीगचा अंतिम सामना दिल्लीत खेळवला जाईल, त्यानंतर लगेचच आयपीएलसाठी मैदान तयार करण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे दिल्लीचे पहिले दोन सामने विशाखापट्टणम येथे होणार आहेत. तसेच देशात यावर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे आता फक्त 17 दिवसांचा आयपीएल कार्यक्रम समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.

हेही वाचा – IPL 2024: घोट्याच्या शस्त्रक्रियेमुळे मोहम्मद शमी IPL मधून बाहेर; 2024 वर्ल्ड कप खेळणार की नाही?

चार दिवस होतील डबल हैडर 

17 व्या हंगामात सामन्यांना सायंकाळी साडेसात सुरूवात होईल, तर दुपारी होणारे सामने दुपारी साडेतीन वाजता सुरू होतील. 21 सामन्यांच्या जाहीर कार्यक्रमात डबल हैडर सामने 4 दिवस होणार आहेत. त्याचवेळी, उर्वरित दिवसांमध्ये प्रत्येकी एक सामना खेळवला जाईल. 23 मार्च, 24 मार्च, 31 मार्च आणि 7 एप्रिल रोजी डबल हैडर सामने खेळवले जातील.

सविस्तर माहिती लवकरच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -