घरक्रीडाSRH VS RCB : हैदराबादने रचला धावांचा डोंगर; सर्वाधिक धावसंख्या करत स्वत:चा...

SRH VS RCB : हैदराबादने रचला धावांचा डोंगर; सर्वाधिक धावसंख्या करत स्वत:चा विक्रम मोडला

Subscribe

बंगळुरू : सलामीवर ट्रॅव्हिस हेडची शतकी खेळी आणि हेनरिक क्लासेनच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली आहे. यंदाच्या हंगामात हैदराबाद संघाने मुंबईविरुद्ध 277 धावा केल्या होत्या, मात्र आता त्यांनी निर्धारीत 20 षटकात 3 विकेट गमावत 287 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे हैदराबादने संघाने अवघ्या 19 दिवसांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे. (IPL 2024 SRH VS RCB Sunrisers Hyderabad set highest total in IPL history)

बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. मात्र त्यांचा हा निर्णय कुठेतरी चुकल्याचे पाहायला मिळाले. बंगळुरूच्या गोलंदाजांवर हैदराबादचे फलंदाज तुटून पडले. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. हेडने 41 चेंडूत 102 धावांची तुफानी खेळी खेळली. तर, अभिषेकने 22 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. यानंतर हेनरिक क्लासेनने 31 चेंडूत 67 धावांची स्फोटक खेळी खेळली. यानंतर शेवटच्या षटकांमध्ये ॲडम मार्करामने नाबाद 17 चेंडूत 32, तर अब्दुल समदने 10 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. या सर्व फलंदाजाच्या दमदार खेळीमुळे हैदराबाद संघाने 3 विकेट गमावत 287 धावांचा डोंगर उभा करत आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

- Advertisement -

हेही वाचा – SRH VS RCB : हैदराबादने रचला धावांचा डोंगर; सर्वाधिक धावसंख्या करत स्वत:चा विक्रम मोडला

- Advertisement -

वेगवागन शतक करणार ट्रॅव्हिस हेड चौथा खेळाडू (Travis Head is the fourth player to score a century)

ट्रॅव्हिस हेडने स्फोटक खेळी करताना अवघ्या 39 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. त्याने 41 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 102 धावांची शानदार खेळी केली. या खेळीसह ट्रॅव्हिस हेडने अवघ्या 39 चेंडूत शतक झळकावून ॲडम गिलख्रिस्टचा विक्रम मोडीत काढला आहे. आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा हेड हा चौथा फलंदाज ठरला आहे. गिलख्रिस्टने 2008 मध्ये 42 चेंडूत शतक झळकावले होते. असे असले तरी आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2013 मध्ये केवळ 30 चेंडूत शतक झळकावले होते. त्याचबरोबर युसूफ पठाणचे नाव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पठाणने मुंबई इंडियन्सविरुद्ध 37 चेंडूत शतक झळकावले होते. त्यानंतर डेव्हिड मिलरने बंगळुरूविरुद्ध 38 चेंडूत शतक झळकावले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -