घरक्रीडाSuryakumar Yadav: हार्दिक पांड्यासाठी गूड न्युज; टी-20 चा नंबर-1 फलंदाज सूर्यकुमार यादव...

Suryakumar Yadav: हार्दिक पांड्यासाठी गूड न्युज; टी-20 चा नंबर-1 फलंदाज सूर्यकुमार यादव लवकरच परतणार

Subscribe

टी-20 चा नंबर-1 फलंदाज सूर्यकुमार यादव फिट झाला असून लवकरच तो मुंबईच्या प्लेइंग-11 मध्ये पुनरागमन करू शकतो.

नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात आतापर्यंत मुंबई इंडियन्स (MI) संघ गटांगळ्या खाताना दिसत आहे. रोहित शर्माच्या जागी नवा कर्णधार हार्दिक पांड्यासह मैदानात उतरलेल्या संघाने आतापर्यंतचे पहिले तीन सामने गमावले आहेत. पण, अशातच कर्णधार पांड्या आणि संघासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे बाहेर असलेला टी-20 चा नंबर-1 फलंदाज सूर्यकुमार यादव फिट झाला असून लवकरच तो मुंबईच्या प्लेइंग-11 मध्ये पुनरागमन करू शकतो. (IPL 2024 T20 number 1 batsman Suryakumar Yadav Fit to Join IPL MI Team Good news for Hardik Pandya )

एका विश्वसनीय सूत्रानुसार, सूर्याला फिट घोषित करण्यात आले असून तो लवकरच संघात सामील होण्याची शक्यता आहे. दुखापत झाल्याने उपचारासाठी सुर्या NCA (नॅशनल क्रिकेट अकादमी) मध्ये होता. याच कारणामुळे तो पहिले 3 सामने खेळू शकला नाही.

- Advertisement -

5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या रोहित शर्माला फ्रँचायझीने काढून बाजूला केले आणि स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. यानंतर संघाने एकदाही चांगली कामगिरी केलेली नाही. या मोसमातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये मुंबई संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय कर्णधार पांड्यालाही चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

मुंबईचा पुढील सामना दिल्लीसोबत

चालू मोसमात मुंबईला पहिल्या सामन्यात गुजरातविरुद्ध, दुसऱ्या सामन्यात हैदराबादविरुद्ध आणि तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. मुंबई संघाला आता आपला पुढचा सामना रविवारी म्हणजेच 7 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचा आहे.

- Advertisement -

या मोसमात मुंबई इंडियन्स संघ:

हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव (सुरुवातीच्या सामन्यांपैकी), इशान किशन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष. चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, क्वेना माफाका.

(हेही वाचा: IPL 2024 DC Vs KKR: कोलकाताचा सलग तिसरा विजय, दिल्ली कॅपिटल्सवर 106 धावांनी विजय, नरेन-अंक्रिशचे अर्धशतक)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -