इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वाची आजपासून (22 मार्च) सुरूवात होत आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. पण आयपीएलचे हे पर्व सुरू होण्यापूर्वी नियमांपासून ते खेळाडूंपर्यंत अनेक बदल झाल्याचा पाहायला मिळत आहे. अशातच गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघातही मोठे बदल झाल्याची माहिती समोर येत आहे. (IPL 2024 tanush kotian and br sharath included in ipl rajasthan royals gujarat titans)
पहिला सामना गुजरात अथवा राजस्थान यांचा नसला तरी आता प्रत्येक संघाने आपल्या संघातील कमी भरून काढण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार, गुजरात टायटन्सने यष्टीरक्षक आणि फलंदाज बीआर शरथ याला आपल्या संघात दाखल केले आहे. गुजरात संघातील रॉबिन मिंज याचा रस्ता अपघात झाला होता. या अपघातात तो जखमी झाला होती. त्यामुळे यंदाच्या पर्वात रॉबिन मिंज याची जागा बीआर शरथ याने घेतली आहे. तसेच, राजस्थान रॉयल्स संघाने तनुष कोटियन याला आपल्या संघात दाखल केले आहे. तनुष याने संघातील फिरकी गोलंदाज ॲडम झाम्पाची जागा घेतली आहे. ॲडम झाम्पा हा वैयक्तिक कारणांमुळे बाहेर पडला होता.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बीआर शरथ कर्नाटकचे प्रतिनिधित्व करतो. आतापर्यंत त्याने 20 प्रथम श्रेणी, 43 लिस्ट-ए आणि 28 टी-20 सामने खेळून एकूण 1676 धावा केल्या आहेत. शरथ हा त्याच्या 20 लाखांच्या मूळ किमतीत गुजरातच्या संघाच्या ताफ्यात दाखल झाला आहे. तसेच, तनुष कोटियन याने नुकताच झालेल्या 42 व्या रणजी ट्रॉफीत विजेतेपद जिंकून मुंबईत महत्त्वपूर्ण योगदान दिले. तनुष देखील 20 लाखांच्या मूळ किमतीत राजस्थानमध्ये सामील झाला आहे. तनुषने 23 टी-20, 26 प्रथम श्रेणी सामने आणि 19 लिस्ट-ए सामने खेळले आहेत.
आजचा सामना कुठे होणार?
आजचा सामना एमए चिदंबरम स्टेडीअम होणार आहे. या सामन्यापूर्वी आयपीएलच्या 17 व्या पर्वाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात अभिनेता अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि प्रसिद्ध गायक एआर रहमान यांसारखे दिग्गज समावेश घेणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स (CSK) : ऋतुराज गायकवाड़ (कप्तान), महेंद्र सिंह धोनी, मोईन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सेंटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, महीश तीक्ष्णा, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकुर, डेरिल मिचेल, समीर रिजवी, मुस्ताफिजुर रहमान, अवनीश राव अरावली.
रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (RCB) : फाफ डु प्लेसिस (कप्तान), ग्लेन मैक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जैक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडगे, मयंक डागर, विजय कुमार वैशाक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉप्ली, हिमांशु शर्मा, राजन कुमार, कैमरन ग्रीन, अल्जारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरेन, लॉकी फर्ग्यूसन, स्वप्निल सिंह, सौरव चौहान.
हेही वाचा – Virat Kohli : केवळ 6 धावांची गरज; पहिल्याच सामन्यात कोहली करणार विश्वविक्रम?