Homeक्रीडाBudget 2025 : एकट्या ऋषभ पंतला भरावे लागणार 8 कोटी रूपये, नव्या...

Budget 2025 : एकट्या ऋषभ पंतला भरावे लागणार 8 कोटी रूपये, नव्या करप्रणालीचा ‘IPL’वर असाही परिणाम

Subscribe

union budget 2025 : अर्थसंकल्पात बदलण्यात आलेल्या करप्रणालीचा खेळांडूच्या कमाईवर परिणाम होणार आहे

दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात प्राप्तिकरदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या कर प्रणालित सात टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार नोकरदार वर्गाला नवीन कर व्यवस्थेनुसार 12.75 लाख रूपयांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर कोणाताही कर भरावा लागणार नाही. परंतु, एखाद्याचे उत्पन्न 24 लाख रूपयांपेक्षा अधिक असेल, तर त्याला 30 टक्के कर भरावा लागेल.

आता आपण जरा नोकरदार वर्गापासून खेळाकडे येऊया. इंडियन प्रिमियर लीगमधील ( आयपीएल ) खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली लागते. ‘आयपीएल’च्या लिलावत कोट्यावधी रूपयांचे उड्डाणे घेतली जातात. लाखांपासून कोटीपर्यंत खेळांडूवर बोली लावली जाते. हे सांगण्याचा मुद्दा की, अर्थसंकल्पात बदलण्यात आलेल्या करप्रणालीचा खेळांडूच्या कमाईवर परिणाम होणार आहे.

हेही वाचा : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर राहुल गांधींची तिखट प्रतिक्रिया; म्हणाले, बंदुकीची गोळी लागलेल्या जखमांवर…

आयपीएल 2025 मधील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत आहे. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटी रूपयांना लिलावात खरेदी केले होते. त्यामुळे ऋषभ पंतला 30 टक्क्यानुसार 8 कोटी 10 लाख रूपये कर म्हणून भरावे लागतील. सोप्या भाषेत सांगायचे तर, एखाद्या खेळाडू 1 कोटी रूपयांच्या पगारावर खेळत असेल, तर त्याला 30 टक्के कर भरून 70 लाख मिळतील. त्याला 30 लाख रूपयांचा कर भरावा लागेल.

कशी आहे नवी करप्रणाली?

  • 0-4 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न : 0 कर
  • 4-8 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न : 5 % कर
  • 8-12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न : 10% कर
  • 12-16 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न : 15% कर
  • 16-20 लाखांपर्यंतचे उत्पन्न : 20% कर
  • 20-24 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न : 25% कर
  • 24 लाखांपेक्षा जास्त : 30% कर

हेही वाचा : अर्थसंकल्पातून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळाले? अजितदादांनी A टू Z सगळं सांगितले