Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाIPL 2025 Schedule Announced : आरसीबी-केकेआरमध्ये पहिला सामना, जाणून घ्या वेळापत्रक

IPL 2025 Schedule Announced : आरसीबी-केकेआरमध्ये पहिला सामना, जाणून घ्या वेळापत्रक

Subscribe

नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेला येत्या 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा सुरू व्हायला अवघे दोन दिवस बाकी असतानाच क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025 Schedule Announced) 18 व्या हंगामाचे बिगुल वाजले असून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएल 2025 चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात येणार आहे. (IPL 2025 schedule has been announced and the first match will be played between RCB and KKR)

आयपीएल 2025 चा पहिला सामना पुढील महिन्यात 22 मार्च रोजी ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल, तर 18 व्या हंगामाचा अंतिम सामनाही 25 मे रोजी ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळला जाईल. दरवर्षी आयपीएलचा पहिला सामना मागील हंगामात अंतिम सामना खेळणाऱ्या दोन संघांमध्ये खेळला जातो, परंतु यावेळी तसे होताना दिसणार नाही. गेल्या हंगामाच्या म्हणजेच आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले होते, परंतु यंदा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे.

आयपीएल 2025 मध्ये 13 शहरांमध्ये 10 संघांमध्ये एकूण 74 सामने खेळवले जातील. लखनऊ, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गुवाहाटी, बेंगळुरू, न्यू चंदीगड, जयपूर, दिल्ली, कोलकाता आणि धर्मशाळा येथे सर्व सामने खेळवले जातील. यामध्ये नॉकआउट म्हणजेच प्लेऑफ सामन्याचा समावेश आहे. तर लीग टप्प्यातील सामने 22 मार्च ते 18 मे दरम्यान खेळवले जातील. महत्त्वाचे म्हणजे आयपीएल 2025 मध्ये एकूण 12 डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत. याशिवाय 20 मे रोजी हैदराबादमध्ये क्वालिफायर 1, 21 मे रोजी हैदराबादमध्ये एलिमिनेटर, 23 मे रोजी कोलकातामध्ये क्वालिफायर 2 आणि 25 मे रोजी कोलकाता येथे अंतिम सामना खेळवला जाईल.

दोन संघांच्या कर्णधाराची घोषणा होणे बाकी 

नोव्हेंबर 2025 च्या मेगा लिलावानंतर लखनऊ सुपर जायंट्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अलीकडेच त्यांचे कर्णधार जाहीर केले. मेगा लिलावात तब्बल 27 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेला विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत यंदा लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करताना दिसेल. तर मेगा लिलावात 26.75 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेला फलंदाज श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचे नेतृत्व करेल. महत्त्वाचे आयपीएलच्या संपूर्ण हंगामात खराब प्रदर्शन करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रजत पाटीदारला त्यांचा नवीन कर्णधार म्हणून घोषित केले. आयपीएल 2025 च्या वेळापत्रकाची घोषणा झाल्यानंतर आता स्पर्धा सुरू व्हायला फक्त महिना बाकी आहे. मात्र अद्यापही दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांनी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केलेली नाही. त्यामुळे हे दोन्ही संघ कोणाकडे कर्णधारपद सोपवितात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, आयसीसीकडून अतिरिक्त तिकीट विक्रीची घोषणा