घरक्रीडाआयपीएल लिलावात 'या' मिस्ट्री गर्लने लावली कोट्यावधींची बोली!

आयपीएल लिलावात ‘या’ मिस्ट्री गर्लने लावली कोट्यावधींची बोली!

Subscribe

आयपीएल २०२० साठी गुरुवारी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव कार्यक्रम पार पडला. या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूचं वर्चस्व राहिलं. यामध्ये ऑस्ट्रेलियन संघातील सहकारी ग्लेन मॅक्सवेल आणि नेथन कुल्टर-नाईल यांच्यावरही संघांनी मोठी बोली लावली. किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने १०.७५ कोटींच्या बोलीसह ग्लेन मॅक्सवेला आपल्या संघात सामविष्ट करणात यश मिळालं. या आयपीएल लिलावामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने सर्वाधिक ४२.७० कोटींचा रुपयांचा बोली लावून सहभागी झाले आहेत. अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये मिस्ट्री गर्ल्सची चर्चा असते. २०१८ मधील मालती चहर असो या आरसीबी चाहती दीपिका घोष असो. यंदाच्या वर्षी देखील एका मिस्ट्री गर्ल चर्चेत आली आहे.

- Advertisement -

गुरुवारी आयपीएल २०१९च्या लिलावादरम्यान सनरायझर्स हैदराबादचे मार्गदर्शन व्हीव्हीएस लक्ष्मण, मुथय्या मुरलीधरन आणि प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांच्यासोबत ही चर्चेत असलेली मिस्ट्री गर्ल दिसली. ती सतत लिलावादरम्यान दिसली. पहिली खरेदी करण्यासाठी एसआरएचला जवळपास एक तास लागला. मात्र तोपर्यंत या मिस्ट्री गर्लमुळे सोशल मीडियावर खळबळ झाली होती.

- Advertisement -

एसआरएच संघाचे मालक कलानिथ मारन यांची २७ वर्षांची मुलगी आहे. काव्या मरन असं या मुलीचं नाव असून ती फ्रँचायझीची सहकारी मालक आहे. काव्या एक क्रिकेट प्रेमी आहे. ती सध्या सन टीव्ही आणि सन टीव्हीच्या एफएम वाहिन्यांचे काम पाहते.

सर्वप्रथम काव्या आयपीएल २०१८ दरम्यान दिसली होती. यावेळेस ती कोप्पलच्या राजीव गांधी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्या दरम्यान हैदराबादचे समर्थन करताना दिसली होती. काव्याचे चेन्नई येथून एमबीए झालं आहे. सध्या तिचे संपूर्ण लक्ष आयपीएलवर आहे.


हेही वाचा – हॅटट्रिकमागे चार-पाच महिन्यांची मेहनत!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -