घरक्रीडाIPL Auction 2022: दिल्ली कॅपिटल्स संघ पूर्ण; गोलंदाजी मजबूत-मधली फळी कमकुवत, पाहा...

IPL Auction 2022: दिल्ली कॅपिटल्स संघ पूर्ण; गोलंदाजी मजबूत-मधली फळी कमकुवत, पाहा खेळाडूंची यादी

Subscribe

आयपीएल लिलाव 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने सर्वाधिक रक्कम गोलंदाज आणि अष्टपैलूंवर खर्च केली. त्यामुळे प्रथमदर्शनी संघाची फलंदाजी अननुभवी पाहायला मिळतेय. मात्र, संघासोबत डेव्हिड वॉर्नरसारखा सामनावीर फलंदाज जोडला गेलाय. तो पृथ्वी शॉसोबत डावाची सुरुवात करताना दिसणार आहे.

नवी दिल्ली : आयपीएल 2022 मध्ये आपला संघ पूर्ण करणारी दिल्ली कॅपिटल्स ही पहिली टीम ठरलीय. त्यांनी 2022 च्या आयपीएल लिलावात 15 खेळाडू खरेदी केलेत. त्यापैकी 4 खेळाडूंना कायम ठेवलेय. अशा प्रकारे दिल्ली कॅपिटल्सच्या संघात आतापर्यंत 19 सदस्य खेळाडू आहेत. आयपीएल संघात किमान 18 आणि जास्तीत जास्त 25 सदस्य असू शकतात. 19 खेळाडूंना सोबत आणूनही अद्याप 4 कोटी 60 लाख रुपये शिल्लक आहेत.

आयपीएल लिलाव 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने सर्वाधिक रक्कम गोलंदाज आणि अष्टपैलूंवर खर्च केली. त्यामुळे प्रथमदर्शनी संघाची फलंदाजी अननुभवी पाहायला मिळतेय. मात्र, संघासोबत डेव्हिड वॉर्नरसारखा सामनावीर फलंदाज जोडला गेलाय. तो पृथ्वी शॉसोबत डावाची सुरुवात करताना दिसणार आहे. दिल्लीच्या मधल्या फळीत कर्णधार ऋषभ पंतसह मनदीप सिंग, सरफराज खान, अश्वीन हेब्बर आणि यश धुलसुद्धा फलंदाजी करताना पाहायला मिळतील. नुकताच अंडर 19 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार यश धुल होता. भारतीय संघाचा भावी स्टार म्हणून त्याच्याकडे पाहिले जातेय.

- Advertisement -

मिचेल मार्श, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, ललित यादव हे दिल्ली संघात अष्टपैलू खेळाडू आहेत. या अष्टपैलू खेळाडूंवर मधल्या फळीचे दडपण कमी करण्याची जबाबदारी राहणार आहे. शार्दुल ठाकूर हा संघासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.
एनरिक नोर्किया, मुस्तफिजुर रेहमान, चेतन साकारिया, खलील अहमद, कमलेश नागरकोटी आणि कुलदीप यादव यांच्यावर दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीची जबाबदारी असेल. नोर्कियाचे नेतृत्व करणारे तीन डावखुरे वेगवान गोलंदाज संघाची ताकद बनू शकतात, त्यांना शार्दुल ठाकूर आणि मिचेल मार्श यांचीही मदत मिळेल. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव फिरकी गोलंदाजी सांभाळतील.

दिल्ली कॅपिटल्स पूर्ण संघ:

ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मनदीप सिंग, सरफराज खान, यश धुल,अश्विन हेब्बर, के.एस. भरत, मिचेल मार्श, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, ललित यादव, रिपल पटेल, एनरिक नोर्किया, मुस्तफिझूर रहमान, खलील अहमद, चेतन साकारिया, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी.

- Advertisement -

हेही वाचाः Odean Smith IPL 2022 Auction: धवन, कोहलीला बाद करणाऱ्यावर पंजाब किंग्जकडून पैशांचा पाऊस, जाणून घ्या कितीला खरेदी?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -