घरक्रीडाIPL Auction 2022: फेब्रुवारीमध्ये बंगळूरुत होणार आयपीएल मेगा ऑक्शनचे आयोजन?, जाणून घ्या...

IPL Auction 2022: फेब्रुवारीमध्ये बंगळूरुत होणार आयपीएल मेगा ऑक्शनचे आयोजन?, जाणून घ्या अपडेट

Subscribe

यंदाचा आयपीएलचा हंगाम भरपूर खास आणि रोमांचक ठरणार आहे. कारण आतापर्यंत आयपीएलमध्ये ८ संघ भाग घेत होते. परंतु यंदाच्या हंगामात एकूण १० संघ खेळताना दिसणार आहेत.

आयपीएल 2022 ची तयारी सुरु करण्यात आली आहे. मागील हंगाम चांगलाच रोमांचक होता आणि चेन्नई सुपर किंग्ज चॅम्पियन बनली होती. यंदा मालिकेमध्ये एकूण १० संघ खेळणार आहेत. काही दिवसांपूर्वीच लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांची घोषणा करण्यात आली आहे. आगामी हंगामासाठी खेळाडूंचे मेगा ऑक्शन चालू महिन्यात आयोजित करण्यात येणार होते. परंतु बीसीसीआईने ऑक्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु खेळाडूंचे ऑक्शन कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

फेब्रुवारी महिन्यात बंगळुरुमध्ये आयपीएलसाठी खेळाडूंचे मेगा ऑक्शनचे आयोजन करण्यात येणार आहे. हे ऑक्शन १२ आणि १३ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. २ दिवस चालणाऱ्या या ऑक्शनमध्ये १० फ्रेंचाइजी खेळाडूंवर बोली लावतील. लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन संघ मालिकेत सहभागी असतील. मात्र बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. जानेवारीतच ऑक्शन होणार होते मात्र ऐनवेळी पुढे ढकलले आहे.

- Advertisement -

यंदाचा आयपीएलचा हंगाम भरपूर खास आणि रोमांचक ठरणार आहे. कारण आतापर्यंत आयपीएलमध्ये ८ संघ भाग घेत होते. परंतु यंदाच्या हंगामात एकूण १० संघ खेळताना दिसणार आहेत. कारण लखनऊ आणि अहमदाबाद या दोन संघांची घोषणा करण्यात आली आहे. टीम वाढल्यामुळे स्पर्धेत उत्साहाचे वातावरण निर्ण झाले आहे. आयपीएलच्या चाहत्यांनाही आता एकाहून एक चांगले सामने पाहायला मिळणार आहेत. परंतु सध्या सगळ्यांचे लक्ष खेळाडूंचे ऑक्शन कधी होणार यावर लागले आहे. तसेच बड्या खेळाडूंवर कोणती फ्रेंचाईजी दावा लावणार याकडेही पाहिले जाईल.


हेही वाचा : Novak Djokovic : नोवाक जोकोविच विना लसीकरण फ्रेंच ओपन खेळू शकतो, फ्रांसच्या क्रीडा मंत्र्यांचे मोठं विधान

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -