घरक्रीडाIPL Auction 2021: लिलावात 'हे' खेळाडू ठरणार सर्वात महागडे

IPL Auction 2021: लिलावात ‘हे’ खेळाडू ठरणार सर्वात महागडे

Subscribe

यंदाचा IPL 2021 चा लिलाव होणार औत्सुक्याचा

आयपीएलच्या आगामी १४ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामासाठी १८ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे पार पडणार आहे. अनेक संघांनी बरेच जुने खेळाडू संघात कायम ठेवले आहेत. तर काही संघांनी नव्या दिग्गज खेळाडूंना आपल्या संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. IPL 2021 या लिलावासाठी १११४ खेळाडूंची नोंद झाली आहे. यामध्ये १६४ भारतीय खेळाडूंसह १२५ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तर 3 खेळाडू आयसीसीशी संलग्न राष्ट्रांतील असल्याची माहिती आहे. त्यामुळे या लिलावाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. या तिघांना खरेदी करण्यासाठी अनेक संघात रस्सीखेच पाहायला मिळू शकते. (IPL Auction 2021) IPL 2021 च्या लिलावासाठीच्या बोलीची किंमत २० लाखापासून ते २ कोटींच्या घरात आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडूवर काय बोली लागते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

‘हे’ खेळाडू ठरणार महागडे

१.ग्लेन मॅक्सवेल

ऑस्ट्रेलियाचा ताकदवान खेळाडू ग्लेन मॅक्सवेलवर किती बोलू लागू शकते याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. IPL 2020 मध्ये ग्लेन मॅक्सवेला संघात चांगली कामगिरी करता आली नाही. यानंतर यंदाच्या IPL 2021 च्या स्पर्धेसाठी किंग्स इलेवन पंजाबने त्याला रिलीज केले. परंतु यंदा भारतात होणाऱ्या IPL 2021 च्या स्पर्धेत मॅक्सवेवर चांगली बोली लागण्याची शक्यता आहे. आयपीएल 2021 च्या लिलावात ग्लेन मॅक्सवेलची बेस प्राईज दोन करोड रुपये आहे. त्यामुळे कोणता संघ ग्लेन मॅक्सवेलवर बोली लावतो. हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

- Advertisement -

२.स्टीव्ह स्मिथ

आयपीएल 2020 च्या 14 सामन्यांमध्ये 311 धावा करणार्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला यंदा संघातून रिलीज करण्यात आले. परंतु इतर संघात त्याला महत्त्वाचे स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल 2021मध्ये ऑस्ट्रेलियन स्टार स्टीव्ह स्मिथही सर्वाधिक भाव खाऊन जाऊ शकतो. स्टीव्ह स्मिथचं आयपीएलमधील कामगारी अधिक चांगली राहिली आहे. आयपीएलमध्ये 95 सामन्यात 35.34 च्या सरासरीनं 2333 धावा केल्या आहेत.

३.डेविड मलान

यानंतर आयसीसी टी20 इंटरनेशनल रॅंकिंगमध्ये नंबर वन ठरलेला फलंदाज डेविड मलान सर्वात महाग खेळाडू ठरणार आहे. मलानची बेस प्राईज दीड करोड रुपये आहे. टी 20 मध्ये मलानची खेळी जबरदस्त राहिलेलं आहे. मलाननं इंग्लंडकडून खेळताना 19 टी20 सामन्यात 53.44 च्या सरासरीनं आणि 150 च्या स्ट्राईक रेटनं 855 धावा बनवल्या आहेत. यात एक शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.

- Advertisement -

‘या’ खेळाडूंवरही साऱ्यांच्या नजरा

IPL 2021 च्या लिलावात भारतीय खेळाडू हरभजन सिंग आणि केदार जाधवसह परदेशी खेळाडूंनावरही विषेश बोली लागण्याची शक्यता आहे. हरभजन आणि केदार जाधव यांना चेन्नई सुपर किंग्सनं आपल्या करारातून मुक्त केल्याने लिलावात चांगली रक्कम मिळण्याची मोकळीक मिळाली आहे. त्या दोघांसह अकरा परदेशी शिलेदारांची मूळ किंमत दोन कोटी रुपये ठरवण्यात आली आहे. शकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लन्केट, जेसन रॉय आणि मार्क वूड यांचा त्या अकराजणांत समावेश आहे.

कसा होईल हा लिलाव

गुरुवारी, 18 फेब्रुवारी 2021ला आयपीएलचा लिलाव आहे.यंदाच्या वर्षीचा लिलाव हा चेन्नईमध्ये पार पडणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3 वाजता या लिलावास सुरुवात होणार आहे. Star Sports 1, Star Sports 3, Star Sports 1 HD, Star Sports 3 HD अशा वाहिन्यांवर हा लिलावाचा कार्यक्रम पाहता येणार आहे.Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आयपीएलच्या लिलाव कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहता येईल.


हेही वाचा- IPL 2021 Auction: ग्लेन मॅक्सवेलला ‘हा’ संघ करू शकेल खरेदी!

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -