घरक्रीडाIPL Birthday : 16 वर्षांपूर्वी खेळला गेला पहिला सामना; जाणून घेऊया आजपर्यंतचा...

IPL Birthday : 16 वर्षांपूर्वी खेळला गेला पहिला सामना; जाणून घेऊया आजपर्यंतचा प्रवास

Subscribe

क्रिकेट जगतासाठी 18 एप्रिल हा दिवस खूप खास आहे. कारण आजच्याच दिवशी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलची सुरुवात झाली होती. त्यानिमित्त आपण आयपीएलच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया...

मुंबई : क्रिकेट जगतासाठी 18 एप्रिल हा दिवस खूप खास आहे. कारण आजच्याच दिवशी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलची सुरुवात झाली होती. 18 एप्रिल 2008 मध्ये आयपीएलचा पहिल्या सामना खेळला गेला. हा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला होता. आयपीएलचा पहिला हंगाम शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने (RR) जिंकला होता. आजच्या दिवशी आयपीएलला 16 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आपण आयपीएलच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया… (IPL Birthday First match played 16 years ago)

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पहिल्या सामन्यात भारताचे दिग्गज खेळाडू म्हणजे सौरव गांगुली कोलकात संघाचे कर्णधारपद सांभाळत होता, तर राहुल द्रविड आरसीबीचे कर्णधारपद सांभाळत होता. पहिल्याच सामन्यात ब्रँडन मॅक्युयलम मॅक्युलमच्या शानदार खेळीमुळे कोलकाता संघाने 3 विकेट गमावत 222 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र या धावांचा पाठलाग करताना आरसीबी संघ 15.1 षटकात केवळ 82 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे कोलकाता संघाने पहिला सामना 140 धावांनी जिंकला होता. या सामन्यात ब्रँडन मॅक्युयलमने अवघ्या 73 चेंडूत 10 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीने नाबाद 158 धावांची शानदार खेळी केली होती. त्यामुळे तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ या पुरस्काराचा महिला मानकरी ठरला होता.

- Advertisement -

हेही वाचा – T20 World Cup 2024 : आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड? संभाव्य खेळडूंची यादी जारी

राजस्थानला आयपीएलचं पहिलं जेतेपद (Rajasthan’s first IPL title)

आयपीएलच्या पहिल्या हंगामात दिवंगत ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने जेतेपद जिंकले होते. राजस्थान रॉयल्सने पहिल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा 3 विकेट राखून पराभव केला होता. तेव्हा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत होता.

- Advertisement -

आयपीएलला वादाची किनार (Controversial edge to IPL)

क्रिकेट खेळणारा प्रत्येक देश आयपीएलचे मॉडेल स्वीकारताना दिसतो आहे. आयपीएल ही ललित मोदींची कल्पना होती. ते 2008 ते 2010 या पहिल्या तीन हंगामांसाठी आयपीएलचे अध्यक्ष आणि आयुक्त होते. मात्र आयपीएल 2010  अंतिम सामन्यानंतर ललित मोदी बीसीसीआयमधून बाहेर पडले. त्यांच्यावर पैशाच्या गैरव्यवहारासह अनेक आरोप लावण्यात आले होते. असे असले तरी आतापर्यंत खेळल्या गेलेल्या हंगामात आयपीएलचे सामने हिट होत आहेत, पण दुसरीकडे ही स्पर्धा अनेक वादांनी घेरली गेली आहे. 2013 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप लावण्यात आले होते. त्यावेळी बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्या जावयाला बेकायदेशीर सट्टेबाजीत सहभागी झाल्यामुळे अटक करण्यात आली होती.

आयपीएल विजेत्या संघांची यादी

1. 2008 – राजस्थान रॉयल्स
2. 2009 – डेक्कन चार्जर्स
3. 2010 – चेन्नई सुपर किंग्ज
4. 2011 – चेन्नई सुपर किंग्ज
5. 2012 – कोलकाता नाइट रायडर्स
6. 2013 – मुंबई इंडियन्स
7. 2014 – कोलकाता नाइट रायडर्स
8. 2015 – मुंबई इंडियन्स
9. 2016 – सनरायझर्स हैदराबाद
10. 2017 – मुंबई इंडियन्स
11. 2018 – चेन्नई सुपर किंग्ज
12. 2019 – मुंबई इंडियन्स
13. 2020 – मुंबई इंडियन्स
14. 2021 – चेन्नई सुपर किंग्ज
15. 2022 – गुजरात टायटन्स
16. 2023 – चेन्नई सुपर किंग्ज

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -