मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) स्पर्धेत चांगलीच रंगत येताना पाहायला मिळत आहे. सध्या आयपीएलचे 17 वे पर्व सुरू असून या पर्वातील 14 सामने आतापर्यंत झाले आहेत. तसेच गुणतालिका पाहिली तर, राजस्थान रॉयल्सचा संघ अव्वल स्थानी आहे. अशातच एक महत्त्वाची अपडेच बीसीसीआयकडून समोर आली आहे. त्यानुसार, 2 सामन्यांच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. राजस्थान विरुद्ध कोलकाता आणि गुजरात विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामन्यांच्यी तारखेत बदल करण्यात आला आहे. आयपीएलने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. (IPL Dates 2024 kkr vs rr and gt vs dc match rescheduled new dates announced by bcci)
आयपीएलच्या ट्वीटनुसार, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील सामना 16 एप्रिल रोजी कोलकाता येथे ईडन गार्डन मैदानावर होणार आहे. याआधी हा सामना 17 एप्रिल रोजी होणार होता. तसेच, गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात 16 एप्रिल रोजी होणारा सामना 17 एप्रिल रोजी होणार आहे. गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
🚨 NEWS 🚨
KKR-RR, GT-DC games rescheduled.
Details 🔽 #TATAIPL https://t.co/O56PJaKKv4
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2024
हेही वाचा – MI vs RR : सलग तिसऱ्या सामन्यात मुंबईचा पराभव; राजस्थानचा 6 विकेट राखून विजय
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव सामन्याचा दिवस बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 17 एप्रिल रोजी रामनवमी असून देशभरात रामनवमी उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यामुळे सुरक्षेबाबत आणि कायदा सुव्यवस्थेबाबत कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता सर्वोतपरी प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. विशेष म्हणजे असा स्थितीत आयपीएलच्या सामन्यांना सुरक्षा पुरवणं शक्य होणार नाही. याबाबत पश्चिम बंगाल क्रिकेट असोशिएशनसोबत बीसीसीआयचे बोलणे झाल्याची माहिती समोर येत आहे. याच कारणामुळे कोलकाताचा 17 एप्रिल रोजी होणारा सामना आता 16 एप्रिल रोजी होणार आहे. तसेच, 16 एप्रिल रोजी होणारा गुजरात विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामना 17 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा – IPL 2024: हार्दिकला रोहित शर्माचा पाठिंबा, चाहत्यांना केले हे आवाहन, पाहा व्हिडिओ