घरक्रीडाIPL 2023 Final : अंतिम सामन्यात गुजरातचे CSK संघासमोर 215 धावांचे आव्हान

IPL 2023 Final : अंतिम सामन्यात गुजरातचे CSK संघासमोर 215 धावांचे आव्हान

Subscribe

रविवारी पावसामुळे रद्द झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) अंतर्गत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नईसमोर विजेतेपदासाठी 215 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

रविवारी पावसामुळे रद्द झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) अंतर्गत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नईसमोर विजेतेपदासाठी 215 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

हेही वाचा – CSK Vs GT Final: गेला गेला गेला ‘गिल’ गेला गेला… गुजरातला पहिला झटका

- Advertisement -

चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गतविजेता गुजरात टायटन्स संघ एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरला. त्यानंतर त्यांनी धडाकेबाज फलंदाजी करत चेन्नई संघासमोर 215 धावांचे आव्हान ठेवले आहे. या हंगामात दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली आहे. साखळी फेरीअखेर, गुजरात संघ 14 सामन्यांतून 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर सुपर किंग्ज समान सामन्यांतून 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

पावसाने व्यत्यय आणलेल्या IPL 2023 चा फायनल सामना आता राखीव दिवसावर पोहोचला आणि आज, 29 मे रोजी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेतेपदाचा सामना राखीव दिवसांपर्यंत पोहोचला आहे. चेन्नई सुपर किंगने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात संघाची सुरुवात तुफान फटकेबाजीने झाली. आयपीएलच्या 16 व्या हंगामात तुफान फटकेबाजी करणाऱ्या गीलने याही सामन्यात जोरदार फटकेबाजी केली. परंतु रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर धावा करत असताना धावचीत झाला आणि गिलने विकेट गमावला. रविंद्र जडेजा टाकत असलेल्या सातव्या ओव्हरमध्ये धोनीने पुन्हा एकदा आपल्या हातांनी जादू दाखवत गिलला स्टम्प आऊट केलं आहे. गिल 20 चेंडूत 39 धावा करुन आऊट झाला आहे.

- Advertisement -

त्यानंतर फुल फॉर्मात असलेल्या रिद्धीमान साहाची झेल धोनीने घेत त्याला पुन्हा तंबूत पाठवले. तर 100 धावा करण्याआधीच सुदर्शन LBW करत पाथिरानाने गुजरात संघाला धक्का दिला. पण 20 षटकांमध्ये गुजरात संघ 200 पार धावांचा डोंगर चेन्नई संघासमोर उभा केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -