घरक्रीडाIPL : मुंबई इंडियन्स सोबतच्या कराराची रक्कम पाहून पोलार्डला बसलेला धक्का; ब्राव्होने सांगितला...

IPL : मुंबई इंडियन्स सोबतच्या कराराची रक्कम पाहून पोलार्डला बसलेला धक्का; ब्राव्होने सांगितला किस्सा

Subscribe

मुंबईने पोलार्डला २०१० खेळाडू लिलावात ३.४७ कोटी रुपयांत खरेदी केले. मात्र, त्याआधीच मुंबईने त्याला संघात घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तो फसला.

आयपीएल संघ मुंबई इंडियन्स आणि किरॉन पोलार्ड हे आता एक समीकरणच बनले आहे. मुंबई इंडियन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी पाच वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. मुंबईच्या या यशात पोलार्डची खूप महत्वाची भूमिका आहे. पोलार्डविना मुंबई इंडियन्स संघाचा विचारही अवघड आहे. मुंबईने त्याला २०१० खेळाडू लिलावात ३.४७ कोटी रुपयांत (७ लाख ५० हजार डॉलर्स) खरेदी केले. मात्र, त्याआधीच मुंबईने त्याला संघात घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तो फसला. त्यावेळी मुंबई संघासोबतच्या कराराची रक्कम पाहून पोलार्डला धक्का बसला होता. याबाबतचा किस्सा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने सांगितला.

ब्राव्होने मुंबईला पोलार्डचे नाव सुचवले

ब्राव्हो २००८ ते २०१० या कालावधीत मुंबईकडून खेळला होता. त्यानंतर त्याला चेन्नईने खरेदी केले आणि मुंबईला ब्राव्होची जागा घेऊ शकेल अशा अष्टपैलू खेळाडूची गरज होती. त्यावेळी ब्राव्होने मुंबईला पोलार्डचे नाव सुचवले होते. याबाबत त्याने सांगितले, मुंबईला मी पोलार्डचे नाव सुचवले होते. त्यांनी लगेच पोलार्डशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो दुसऱ्या संघासाठी सामने खेळत होता. मग मी त्यांना ड्वेन स्मिथचे नाव सुचवले आणि त्यांनी स्मिथला संघात घेतले.

- Advertisement -

१९ वर्षीय मुलासाठी खूप मोठी रक्कम

पुढच्या वर्षी चॅम्पियन्स लीग स्पर्धा भारतात झाली. त्यावेळी मी राहुल संघवी (मुंबई व्यवस्थापनाचे सदस्य) यांना फोन केला. ‘पोलार्डसुद्धा भारतात आला आहे. आताच इथे या आणि त्याला करारबद्ध करा,’ असे मी संघवी यांना सांगितले. त्यानंतर ते आणि रॉबिन सिंग मुंबईहून थेट हैदराबादला आले. ते पोलार्डसोबत २ लाख डॉलर्सचा करार करण्यासाठी तयार होते. पोलार्डने तो करार पाहिला आणि कराराची रक्कम पाहून त्याला धक्का बसला. त्रिनिदादच्या १९ वर्षीय मुलासाठी ती खूप मोठी रक्कम होती, असा किस्सा ब्राव्होने सांगितला. मुंबईला त्यावेळी पोलार्डला करारबद्ध करता आले नाही. परंतु, त्यांनी २०१० खेळाडू लिलावात त्याला खरेदी केले.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -