घरIPL 2020त्या दिवशी आजीच्या मृत्यूचं दु:ख पचवून शेन वॉटसन मैदानात उतरला होता!

त्या दिवशी आजीच्या मृत्यूचं दु:ख पचवून शेन वॉटसन मैदानात उतरला होता!

Subscribe

२५ सप्टेंबर रोजी IPL 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने महेंद्रसिंह धोनीच्या CSK ला धूळ चारत अवघ्या १३१ धावांमध्ये त्यांचा खुर्दा उडवला. दिल्ली कॅपिटल्सनं हा सामना तब्बल ४४ रन्सनी जिंकला. या मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा सलामीवीर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराऊंडर शेन वॉटसननं अवघ्या १४ धावा केल्या. पण तरीदेखील शेन वॉटसन या सामन्यासाठी क्रिकेट विश्वात हिरो ठरला आहे. कारण या सामन्याच्या आदल्याच दिवशी वॉटसनच्या आजीचं निधन झालं होतं. मात्र, तरी देखील ते दु:ख पचवून शेव वॉटसन सीएसकेसाठी मैदानात उतरला होता. त्याच्या स्पोर्टिंग स्पिरीटवर क्रिकेट विश्वातून कौतुकाची थाप पडत आहे. गेल्या आयपीएलमध्ये देखील गुडघ्याला गंभीर दुखापत झालेली असून आणि त्यातून रक्त येत असूनही शेन वॉटसन मैदानात खेळण्यासाठी उभा होता!

वॉटसन म्हणाला होता, ‘माझं मन रडतंय’!

शेन वॉटसननं स्वत: या दु:खद घटनेची माहिती दिली होती. तो म्हणाला होता, ‘मी माझ्या घरी आणि माझ्या कुटुंबाला खूप सारं प्रेम पाठवू इच्छितो. मला माहिती आहे की माझी आजी एक खूप चांगली आई होती. माझं मन आत्ता रडतंय. मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो की अशा वेळी मी माझ्या परिवारासोबत नाही’. शेन वॉटसनच्या या जिगरबाज वृत्तीसाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतान काही नेटिझन्सनी याची तुलना सुरेश रैनाशी देखील केली आहे.

- Advertisement -

यंदाच्या आयपीएलमध्ये शेन वॉटसन आपल्या टीमसाठी फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. सीजनच्या पहिल्या ३ मॅचमध्ये मिळून वॉटसनच्या नावावर अवघ्या ५३ धावा जमा आहेत. मात्र, आजीच्या निधनानंतरही मैदानात खेळण्यासाठी उतरलेला वॉटसन सामन्याआधीच लाखो चाहत्यांची मनं जिंकून गेला होता.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -