घरक्रीडाIPL : दुसऱ्या संघाच्या खेळाडूंना घेता येणार भाड्याने; लवकरच येणार नवा नियम

IPL : दुसऱ्या संघाच्या खेळाडूंना घेता येणार भाड्याने; लवकरच येणार नवा नियम

Subscribe

नवी दिल्ली : इंडियन प्रिमियर लीगमध्ये (IPL) एका संघात वीसच्या आसपास खेळाडूंचा भरणा असतो. अशावेळी प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी मिळत नाही किंवा खेळाडू जखमी होतात. अशावेळेला नवीन खेळाडूंला संधी देणे गरजेचे असते. पण आपल्या संघात चांगला खेळाडू नसेल, अशावेळी इतर संघातील चांगल्या खेळाडूला आपल्या संघात संधी देण्याची इच्छा अनेक संघांना असते, मात्र त्यांना तसे करता येत नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये लवकरच नवा नियम लागू करण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) होण्याची शक्यता आहे. या नियमानुसार दुसऱ्या संघातील खेळाडूला आपल्या संघात भाड्याने घेता येणार आहे.

आयपीएलमध्ये खेळाडूंवर बोली लावून त्यांना विकत घेतले जाते. काही वेळेला संघातील खेळाडूंची ट्रेडिंग अंतर्गत अदलाबदली होते, मात्र सामने सुरू झाल्यानंतर खेळाडूंची बदली करता येत नाही. अशावेळेला संघातील खेळाडू फॉममध्ये असल्यावर इतर खेळाडूंना संधी मिळत नाही, तर जखमी खेळाडूंमुळे संघ अडचणीत आल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशा परिस्थितीत फुटबॉलप्रमाणेच आयपीएलमध्येही नियम आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या नियमानुसार खेळाडूंना आता दुसऱ्या संघातील खेळाडूंचा भाड्याने आपल्या संघात समावेश करता येणार आहे. हा नवीन नियम सर्वच संघांना फायदेशीर ठरणार आहे.

- Advertisement -

फुटबॉलप्रमाणेच आयपीएलमध्येही नियम
फुटबॉलमध्ये एखादा खेळाडू जखमी झाल्यास दुसऱ्या संघातील बाकावर बसलेल्या खेळाडूंना आपल्या संघात भाड्याने तात्पुरत्या स्वरुपात करार करून खेळण्याची संधी देण्यात येते. हा करार तात्पुरता असल्यामुळे करार संपल्यानंतर खेळाडू आपल्या जुन्या संघाकडे पुन्हा जातो. असाच नियम आयपीएलमध्येही सुरू करण्याचा विचार सुरू आहे. या नियमानुसार एखादा संघ तात्पुरत्या करारावर दुसर्‍या संघाकडून खेळाडू कर्जाने घेऊ शकणार आहे. खेळाडू बदलीच्या या पर्याय विचार सुरु आहे. हा नवा नियम लागू करण्याबाबत सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) विचार सुरु आहे. हा नियम येत्या काळात लागू आयपीएलमध्ये लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएल हा नियम लागू करणारी ही पहिली लीग ठरेल. कारण इतर देशातील कोणत्याही टी-20 लीगमध्ये तात्पुरत्या कराराअंतर्गत खेळाडू बदलण्याचा नियम अजूनपर्यंत लागू झालेला नाही.

खेळाडूंसोबत तात्पुरता करार होणार
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अनेक संघातील खेळाडू जखमी झाले आहेत. याचा फटका या संघांना चांगलाच बसताना दिसत आहे. याशिवाय अनेक खेळाडूंना संघात खेळण्याची संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत आयपीएल संघ खेळाडूंना कर्जावर देण्याचा विचार करत आहे. हा नियम लागू झाल्यास आयपीएल हंगाम सुरु असताना संघ मधल्या काळात इतर संघातील खेळाडूंना आपल्या संघात स्थान देऊ शकणार आहेत. मात्र, हा करार कायमस्वरूपी नसून, तात्पुरता असणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -