पावसाळ्यानंतर होऊ शकतात IPL चे सामने – राहुल जोहरी

Coronavirus pandemic: IPL 2020 postponed to April 15, matches to be played behind closed doors

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी पावसाळ्यानंतर आयपीएल सामने सुरू करता येतील, असे संकेत दिले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंची सुरक्षा ही सर्वाधिक महत्त्वाची असून आयपीएस सामने खेळायचे की नाही हा निर्णय सर्वस्वी खेळाडूंवर सोपवला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बुधवारी २१ सेंच्युरी मीडियाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारच्या वेळी जोहरी यांनी हे वक्तव्य केले. प्रत्येकाला आपल्या सुरक्षेच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्याचा आम्ही आदर करतो. या संपूर्ण प्रकरणात भारत सरकार बीसीसीआयला मार्गदर्शन करणार आहे. त्याने पालन हे मंडळ करेल. व्यावसायिक स्वरुपात क्रिकेटसंबंधीच्या बाबी पावसाळ्यानंतरच सुरू होतील, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा – दिल्लीः कोरोना लसीच्या नावावर दिलं विष, असा झाला खुलासा

भारतीय खेळाडूंमध्ये होणार सामने ? 

भारतात जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडतो. जर ऑस्ट्रेलियामध्ये होणारी टी२० वर्ल्ड कप स्थगित केली तर आयपीएलचे आयोजन ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान केले जाईल, असे म्हटले जात आहे. राहुल जोहरी म्हणाले की, पावसाळ्यानंतर सर्व परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी आशा आम्ही करतो. तसेच परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार पुढील निर्णय घेतले जातील. आयपीएलमध्ये भारतासोबत इतरही देशातील खेळाडूंचा सहभाग असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थलांतर बंद असताना केवळ भारतीय खेळाडूंना घेऊन आयपीएलचे नियोजन करणे याला जोहरी यांनी नापसंती दर्शवली आहे. जगभरातील सर्वोत्कृष्ठ खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होऊन एकत्रितरित्या खेळतात हीच खरी आयपीएलची गंमत आहे. त्यामुळे नेहमीचसारखेच यंदाच्या सामन्यांचेही नियोजन व्हावे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.