घरक्रीडाIPL 2022 : CSK ची किंग टीमची तयारी, ओपनर खेळाडू गमावला, कोण...

IPL 2022 : CSK ची किंग टीमची तयारी, ओपनर खेळाडू गमावला, कोण रिटेन, कोण बाहेर, वाचा

Subscribe

आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा एकदा भविष्यातील टीम बांधणीसाठी कंबर कसली आहे. त्याअनुषंगाने आजच्या आयपीएलच्या लिलावात खेळाडूंची निवड CSK मार्फत करण्यात येत आहे. आतापर्यंत सीएसकेने चारवेळा जेतेपद मिळवले आहे. आता पाचव्यांदा जेतेपद मिळवत मुंबई इंडियन्सची बरोबरी करण्याचा रेकॉर्ड सीएसकेला करायचा आहे. सीएसकेने रिटेनच्या पर्यायात चार खेळाडूंना संघात कायम केले आहे. तर आजच्या लिलाव प्रक्रियेत दोन नव्या खेळाडूंची खरेदी सीएसकेने आतापर्यंत केली आहे.

सीएसकेने रिटेन केलेल्या चार खेळाडूंमध्ये एक ओव्हरसिज खेळाडूचाही समावेश आहे. या खेळाडूंमध्ये महेंद्रसिंह धोनीला १२ कोटी रूपयांसह रिटेन करण्यात आले. त्यापाटोपाठ रवींद्र जडेजा १६ कोटी, तर मोईन अलीला ८ कोटी रूपये आणि ऋतुराज गायकवाडला ६ कोटी रूपयांना लिलाव प्रक्रियेत खरेदी केले आहे.

- Advertisement -

चेन्नई सुपर किंग्जने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये रॉबिन उथप्पाला २ कोटी रूपयांना खरेदी करण्यात आले आहे. तर ड्वेन ब्राओला ४.४० कोटी इतक्या किंमतीची बोली लावण्यात आली आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा सलामीचा खेळाडू फाफ डु प्लेसिस हा लिलाव प्रक्रियेत सीएसकेकडे आला नाही. यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ कोटी रूपयांमध्ये डु प्लेसिसची खरेदी केली. गेल्या वर्षीपर्यंत धोनीच्या सीएसकेचा भाग होता. पण यंदाच्या लिलाव प्रक्रियेत मात्र त्याची निवड झाली नाही. २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणारा विदेशी खेळाडू म्हणून अव्वल स्थान डुप्लेसीने मिळवले होते. १६ सामन्यात ६३३ धावा केल्या होत्या. २०२१ च्या फायनल मॅचमध्ये ८६ धावांची धमाकेदार खेळी केल्याने चेन्नईला विजेतेपदाचा मान मिळाला होता. फक्त फायनल नव्हे तर पूर्ण सिझनमध्ये डु प्लेसिसने आपला चांगला फॉर्म कायम ठेवला होता. आपल्याच संघातील ऋतुराज गायकवाडने २ धावा अधिक केल्याने डु प्लेसिस ऑरेंज कॅपला मुकला होता. आयपीएलच्या आधी कॅरेबियन प्रिमिअर लिगमध्ये ९ मॅचमध्ये २७७ धावा त्याने केला. या टूर्नामेंटमध्ये एक शतकाचाही समावेश होता.

- Advertisement -

कोणीही बोली न लावलेले खेळाडू कोण

यंदाच्या आयपीएलच्या सिझनमध्ये सुरेश रैनाला सीएसकेने रिटेन केले नाही. पण आयपीएल २०२२ च्या लिलाव प्रक्रियेत सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ, शाकीब अल हसन, डेव्हिड मिलर या खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये सीएसकेमधून बाहेर पडल्यानंतर रैनाच्या पुन्हा आयपीएल समावेशाबाबत प्रश्न चिन्ह आहे. तर दुसरीकडे शाकीब अल हसन सारख्या बांगलादेशच्या अनुभवी ऑलराऊंडरलाही बोली प्रक्रियेत स्थान मिळाले नाही. तर ऑस्ट्रेलियाचा मोठा फलंदाज असलेला स्टीव्ह स्मिथही विकला गेला नाही.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -