घरCORONA UPDATEआयपीएल स्पर्धा 'या' महिन्यात होणार; बीसीसीआयचा सुपर प्लॅन तयार

आयपीएल स्पर्धा ‘या’ महिन्यात होणार; बीसीसीआयचा सुपर प्लॅन तयार

Subscribe

आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयचं कोट्यवधींचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे बीसीसीआय सर्वोतपरी प्रयत्न करत आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर ताबा मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोनामुळे सर्वच कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या, तसंच काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान, भारतातील मोठी आयपीएल स्पर्धा देखील कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. २९ मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, या स्पर्धेवर अद्याप अनिश्चिततेचं सावट आहे. आयपीएल १५ एप्रिलनंतर होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. यावर बीसीसीआयने मास्टर प्लॅन तयार केला आहे.


हेही वाचा – कोविड-१९ वार्डमध्ये आढळलेल्या ५ मांजरींचा मृत्यू

- Advertisement -

आयपीएल होण्यासाठी बीसीसीआयने एक मास्टर प्लॅन तयार केला असून चाहत्यांना या स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे. कोरोनाचं सावट दुर झाल्यास आयपीएल जुलै महिन्यात किंवा हिवाळ्यात खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआय त्यावर विचार करत असून गरज पडल्यास चाहत्यांशिवाय सामना खेळवण्याची तयारी बीसीसीआयने केली आहे,” असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास संपूर्ण आयपीएल रद्द होऊ शकते. आयपीएल रद्द झाल्यास स्टार इंडियाकडून मिळणाऱ्या ३२६९.५० कोटींचा तोटा सहन करावा लागेल. स्टार स्पोर्ट्सने आयपीएलच्या प्रक्षेपणासाठी २०१८ मध्ये पाच वर्षांसाठी १६३४७ कोटी दिले आहेत. शिवाय व्हिवोकडून मिळणारे ४०० कोटीही बीसीसीआयला मिळणार नाहीत. त्यामुळे आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयचं कोट्यवधींचं नुकसान होऊ शकतं.

आयपीएलसाठी आशिया चषक पुढे ढकलण्याची शक्यता

आयपीएल स्पर्धा २०२० ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात येईल, अशी चर्चा होती. तसं झालं तर आशिया चषक २०२० स्पर्धा पुढे ढकलण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. “आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आयपीएल खेळवण्याचा विचार सुरू आहे,” असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -