घरक्रीडाकोलकाताची उथप्पा, लिनला सोडचिठ्ठी

कोलकाताची उथप्पा, लिनला सोडचिठ्ठी

Subscribe

अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पा आणि क्रिस लिन यांना कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या पुढील मोसमासाठी सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. २०२० आयपीएल खेळाडू लिलाव १९ डिसेंबरला कोलकाता येथे पार पडणार असून त्याआधी आठही संघांनी आपल्या प्रमुख खेळाडूंना कायम ठेवत काही खेळाडूंना संघाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला प्रत्येक मोसमात ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जाते. मात्र, त्यांनी अजून एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे त्यांनी तब्बल १२ खेळाडूंना संघाबाहेरचा रस्ता दाखवला. या खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि विंडीजचा फलंदाज शिमरॉन हेटमायरचा समावेश आहे.

- Advertisement -

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, लसिथ मलिंगा, किरॉन पोलार्ड यांसारख्या प्रमुख १८ खेळाडूंना कायम ठेवताना १० खेळाडूंना सोडचिठ्ठी दिली. यामध्ये युवराज सिंग, एव्हन लुईस, बेन कटिंग या खेळाडूंचाही समावेश होता. त्यामुळे मुंबईला पुढील महिन्यात होणार्‍या लिलावात १३.०५ कोटी रुपये इतकी रक्कम खर्च करता येणार आहे.

करारमुक्त करण्यात खेळाडू :

मुंबई – अ‍ॅडम मिल्ने, अल्झारी जोसेफ, बरिंदर स्रान, बेन कटिंग, ब्युरन हेंड्रिक्स, एव्हन लुईस, जेसन बेहरनडॉर्फ, पंकज जस्वाल, रसिक दार, युवराज सिंग

- Advertisement -

चेन्नई – चैतन्य बिश्नोई, डेविड विली, ध्रुव शौरी, मोहित शर्मा, सॅम बिलिंग्स, स्कॉट कुगलायन

दिल्ली – अंकुश बेन्स, अयप्पा, क्रिस मॉरिस, कॉलिन इंग्राम, कॉलिन मुनरो, हनुमा विहारी, जलज सक्सेना, मनजोत कालरा, नथू सिंग

पंजाब – अग्निवेश अयाची, अँड्र्यू टाय, डेविड मिलर, मोयसेस हेन्रिक्स, प्रभसिमरन सिंग, सॅम करन, वरुण चक्रवर्ती

कोलकाता – एन्रिच नॉर्खिया, कार्लोस ब्रेथवेट, क्रिस लिन, जो डेन्ली, केसी करियप्पा, मॅट केली, निखिल नाईक, पियुष चावला, पृथ्वी राज यारा, रॉबिन उथप्पा, श्रीकांत मुंढे

राजस्थान – आर्यमान बिर्ला, अ‍ॅश्टन टर्नर, ईश सोधी, जयदेव उनाडकट, लियाम लिव्हिंगस्टन, ओशेन थॉमस, प्रशांत चोप्रा, राहुल त्रिपाठी, शुभम रांजणे, स्टुअर्ट बिन्नी, सुधेसन मिधुन

बंगळुरू – अक्षदीप नाथ, कॉलिन डी ग्रँडहोम, डेल स्टेन, हेन्रिक क्लासन, हिम्मत सिंग, कुलवंत खजरोलिया, मार्कस स्टोइनिस, मिलिंद कुमार, नेथन कुल्टर-नाईल, प्रयास रे बर्मन, शिमरॉन हेटमायर, टीम साऊथी

हैदराबाद – दीपक हुडा, मार्टिन गप्टिल, रिकी भुई, शाकिब अल हसन, युसुफ पठाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -