घरक्रीडाइराकमध्ये फुटबॉल स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; एक ठार, अनेकजण जखमी

इराकमध्ये फुटबॉल स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; एक ठार, अनेकजण जखमी

Subscribe

इराकमध्ये फुटबॉल स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीत एका फुटबॉलपटूचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना इराकमधील प्रमुख शहर असलेल्या बसरा येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बसरा स्टेडियममध्ये ८ देशांच्या अरेबियन गल्फ कपचा अंतिम सामना यजमान इराक आणि ओमान दरम्यान खेळवला जाणार आहे. तसेच हा सामना पाहण्यासाठी सकाळपासून विनातिकीट हजारो फुटबॉलप्रेमींनी स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. यावेळी ही दुर्घटना घडली.

- Advertisement -

बसरा इंटरनॅशनल स्टेडियमबाहेर जखमी झालेल्या ८० जणांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तर यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या टूर्नामेंटच्या सुरुवातीपासूनच अनेक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये व्हीआयपी सेक्शनच्या आतमध्येही हाणामारी झाली होती. या स्पर्धेला ६ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. तसेच यामध्ये सहा आखाती देश बहारीन, कुवैत, ओमान, कतार, सऊदी अरब आणि संयुक्त अरब अमीरातसोबतच येमेन आणि इराक संघाचाही समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा : IND vs NZ : हार्दिक पांड्या क्लीन बोल्ड; पंचांचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -