Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा IRE vs SA : शम्सीने घेतली आयर्लंडची फिरकी; पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण...

IRE vs SA : शम्सीने घेतली आयर्लंडची फिरकी; पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी

शम्सीने २७ धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. 

Related Story

- Advertisement -

चायनामन फिरकीपटू तबरेझ शम्सीच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या टी-२० सामन्यात आयर्लंडचा ३३ धावांनी पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६५ अशी धावसंख्या उभारली आणि आयर्लंडला २० षटकांत ९ बाद १३२ धावांवर रोखत विजय मिळवला. सध्या जागतिक टी-२० क्रमवारीत गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी असलेल्या शम्सीने चार षटकांत २७ धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

सात फलंदाजांची दुहेरी धावसंख्या

डब्लिन येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात आयर्लंडचा कर्णधार अँडी बालबर्नीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ७ बाद १६५ अशी धावसंख्या उभारली. दक्षिण आफ्रिकेच्या अव्वल आठ पैकी सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्या (१० पेक्षा जास्त धावा) करण्यात यश आले. मात्र, एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. त्यांच्याकडून एडन मार्करमने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. आयर्लंडच्या मार्क अडैरने तीन विकेट घेतल्या.

आयर्लंडने सुरुवातीपासूनच विकेट गमावल्या

- Advertisement -

१६६ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडने सुरुवातीपासूनच ठराविक अंतराने विकेट गमावल्या. हॅरी टेक्टर (३६) आणि तळाच्या बॅरी मॅकार्थीने (३०) चांगली फलंदाजी केली. परंतु, त्यांना इतरांची साथ न लाभल्याने आयर्लंडला २० षटकांत ९ बाद १३२ धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून शम्सीने चार, तर जॉर्ज लिंडे आणि लुंगी इंगिडीने २-२ विकेट घेतल्या.

- Advertisement -