घर क्रीडा Ireland Vs India T20 : हाऊसफुल्ल! भारतीय संघामुळे आयर्लंड क्रिकेट बोर्ड फायद्यात

Ireland Vs India T20 : हाऊसफुल्ल! भारतीय संघामुळे आयर्लंड क्रिकेट बोर्ड फायद्यात

Subscribe

Ireland Vs India T20 : भारताचा युवा संघ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली सध्या आयर्लंड दौऱ्यावर टी-20 (Ireland Vs India T20) मालिका खेळायला गेला आहे. उद्यापासून टी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे, पण त्याआधीच भारतीय क्रिकेटपटूंच्या जागतिक लोकप्रियतेने क्रिकेट आयर्लंडसारख्या नवोदित क्रिकेट मंडळांची मने जिंकली आहेत. (Ireland Vs India T20 House Full Ireland Cricket Board benefited from the Indian team)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते. बीसीसीआय आर्थिक दृष्ट्या सर्वात यशस्वी बोर्ड असल्यामुळे आयसीसीचे सर्व निर्णय त्यांच्यावर अवलंबून असतात. एवढेच नाही तर बीसीसीआय इतर देशांच्या क्रिकेट बोर्डाला मदत करताना दिसतो. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ हा जागतिक क्रिकेट चालवतो, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. विशेष म्हणजे भारतीय संघ जगाच्या पाठीवर कुठंही खेळायला गेला तरी चाहत्यांचा ओघ हा कायम असतो. त्यामुळेच जगभरातील अनेक देशांना भारताने आपल्या देशात मालिका खेळावी असे वाटते.

- Advertisement -

हेही वाचा – Asia Cup 2023: आशिया कपपूर्वी भारताला मोठा दिलासा; राहुल-श्रेयस परतणार ?

भारताचा युवा संघ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली सध्या आयर्लंड दौऱ्यावर टी-20 मालिका खेळायला गेला आहे. उद्यापासून पहिल्या टी-20 सामन्याला सुरूवात होणार असून त्याआधीच भारतीय क्रिकेटपटूंच्या जागतिक लोकप्रियतेने क्रिकेट आयर्लंडसारख्या नवोदित क्रिकेट मंडळांची मने जिंकली आहेत. कारण पहिल्या दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची तिकीटे 100 टक्के विकली गेली आहेत.

- Advertisement -

क्रिकेट आयर्लंडने आपल्या वेबसाइटवर लिहिले की, भारत आणि आयर्लंड यांच्यात होणाऱ्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांची तिकीटे 100 टक्के विकली गेली आहेत आणि तिसऱ्या सामन्यांचीही तिकीटे विकली जात आहेत. 11500 प्रेक्षकांची क्षमता असलेल्या ‘द व्हिलेज’ मलाहाइड क्रिकेट क्लब मैदानावर सर्व सामने खेळवले जातील.

पहिल्या दोन टी-20 सामन्यांची सर्व तिकीटे विकली गेल्यानंतर आयर्लंड संघाचा विकेटकिपर फलंदाज लॉर्कन टकर म्हणाला की, भारतासमोरील खडतर आव्हानाची मला जाणीव आहे. एक मोठा संघ खेळायला येत असल्याने आमच्यावर दबाव आहे. कारण याठिकाणी भारताला खूप पाठिंबा मिळेल. पण असे असले भारतीय क्रिकेट चाहते एवढ्या मोठ्या प्रमाणावर याठिकाणी उपस्थित राहणार असल्यामुळे आयर्लंड क्रिकेटसाठी एकप्रकारे चांगलेच आहे.

हेही वाचा – Rishabh Pant : अपघातानंतर पुन्हा मैदानात परतला ऋषभ पंत; मोठे फटके मारून सर्वांनाच केले चकीत

आम्ही भारतासोबतच्या सामन्यासाठी तयार

लॉर्कन टकर म्हणाला की, भारतासोबतच्या मोठ्या सामन्यांसाठी आमचा संघ खूप उत्सुक आहे. आम्ही विश्वचषक खेळलो आहोत आणि यापूर्वीही भारताविरुद्ध खेळलो आहोत. त्यामुळे मोठ्या दडपणाच्या सामन्यांमध्ये कसे खेळायचे हे आम्हाला माहित आहे. आम्ही यावर्षी खूप क्रिकेट खेळलो असल्यामुळे आम्ही भारतासोबतच्या सामन्यासाठी तयार आहोत. आम्ही स्कॉटलंडमध्ये चांगली कामगिरी करून पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरलो असल्यामुळे संघातील प्रत्येकजण आनंदी आहे.

बुमराह टी-20 क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणारा पहिला गोलंदाज

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीतून बाहेर पडल्यानंतर आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून पुनरागमन करताना संघाचे नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह हा टी-20 क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणारा पहिला गोलंदाज ठरणार आहे. याशिवाय त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघातील अनेक खेळाडू आपले आशिया कप आणि विश्वचषकासाठी संघात स्थान पक्के करण्यासाठी जोर लावणार आहेत. जसप्रीत बुमराहने यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.

जसप्रीत बुमराहवर टी-20 मालिका जिंकण्याचे आवाहन

इंग्लंडमध्ये 2009 टी-20 विश्वचषकाच्या गट सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आयर्लंडचा आठ गडी राखून पराभव केल्यापासून भारताने आयर्लंडविरुद्ध सर्व पाच टी-20 सामने जिंकले आहेत. परंतु हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने अलीकडेच टी-20 मालिकेत भारताचा 3-2 ने पराभव केला. त्यामुळे जसप्रीत बुमराहवर टी-20 मालिका जिंकण्याचे आवाहन असणार आहे.

- Advertisment -