Irfan Pathan On Dhoni: डिव्हिलियर्स नाही तर हा खेळाडू आहे महान फिनिशर, इरफान पठाणचं मोठं वक्तव्य

आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामातील सामने आता जोरदार रंगत आहेत. क्रिकेट प्रेमींचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ आमनेसामने भिडत आहेत. दरम्यान, भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणने भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी फलंदाज महेंद्रसिंग धोनीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. महेंद्रसिंग धोनीची गणना जगातील महान फिनिशरमध्ये केली जाते. त्यामुळे डिव्हिलियर्स नाही तर धोनी हा असा खेळाडू महान फिनिशर म्हणून ओळखला जातो, असं वक्तव्य इरफान पठाणने केलंय.

एमएस धोनी आयपीएलच्या इतिहासातील महान फिनिशर आहे. वर्षानुवर्ष अनेक खेळाडूंची नावे यादीत समाविष्ट होत आहेत. मात्र, धोनीने आपला फॉर्म सोडलेला नाहीये. धोनीसह एबी डिव्हिलियर्स हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठे फिनिशर आहेत, परंतु धोनी सध्या आघाडीवर आहे, असं इरफान पठाण म्हणाला.

सीएसकेला कमी लेखण्याची चूक कोणताही संघ करू शकत नाही, असा दावा इरफान पठाणने केला आहे. पराभवानंतरही विजय कसा खेचायचा हे जाणणारा हा संघ आहे, असं पठाण म्हणाला.

२१ एप्रिल रोजी डीवाय पाटील स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. खरं म्हणजे हा सामना मुंबईच्या हातामध्ये होता. परंतु धोनीने शेवटी म्हणजे फिनिशर म्हणून तुफान खेळी करत मुंबईच्या हातातला हा सामना त्याने हिसकावून घेतला. त्यामुळे मुंबईचा पराभव झाला. एका ४० वर्षीय खेळाडूने अगदी टायमिंगवर एन्ट्री घेत १३ चेंडूत २८ धावा करत मुंबईचा सुपडा साप केला.


हेही वाचा : बोगस क्रमांकावरुन येणाऱ्या कॉल्सबाबत ठाणे महापालिका आयुक्तांचे नागरिकांना आवाहन