घरक्रीडाVijay Hazare Trophy : ईशान किशनची फटकेबाजी; झारखंडच्या नावे झाला 'हा' अनोखा...

Vijay Hazare Trophy : ईशान किशनची फटकेबाजी; झारखंडच्या नावे झाला ‘हा’ अनोखा विक्रम  

Subscribe

किशनने अवघ्या ९४ चेंडूत १७३ धावांची खेळी केली.

कर्णधार ईशान किशनने केलेल्या फटकेबाजीमुळे झारखंडने विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेच्या सामन्यात मध्य प्रदेशचा ३२४ धावांनी धुव्वा उडवला. डावखुऱ्या किशनने या सामन्यात अवघ्या ९४ चेंडूत १९ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने १७३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे झारखंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद ४२२ अशी धावसंख्या उभारली. भारतीय स्थानिक क्रिकेटमधील एकदिवसीय सामन्यात कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

४२ चेंडूत अर्धशतक, ७४ चेंडूत शतक

या सामन्यात मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. किशनने सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने अवघ्या ४२ चेंडूत अर्धशतक आणि ७४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतकानंतर त्याने धावांची गती अधिकच वाढवली. त्याने अखेरच्या ७१ धावा केवळ २० चेंडूत केल्या. अखेर त्याला १७३ धावांवर गौरव यादवने बाद केले. तो बाद झाल्यावर विराट सिंह (४९ चेंडूत ६८) आणि अनुकूल रॉय (३९ चेंडूत ७२) यांनी आक्रमक शैलीत फलंदाजी केल्याने झारखंडने५० षटकांत ९ बाद ४२२ अशी धावसंख्या उभारली.

- Advertisement -

यष्टींमागे सात झेल

४२३ धावांचा पाठलाग करताना मध्य प्रदेशने सुरुवातीपासूनच ठराविक अंतराने विकेट गमावल्या. त्यामुळे त्यांचा डाव १८.४ षटकांत ९८ धावांत संपुष्टात आला. झारखंडकडून वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरॉनने ६ विकेट घेतल्या, तर यष्टींमागे किशनने सात झेल पकडले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -