घरक्रीडाइशान किशनचा वनडे मालिकेत रेकॉर्डब्रेक विक्रम, 'युनिव्हर्स बॉस'लाही सोडलं मागे

इशान किशनचा वनडे मालिकेत रेकॉर्डब्रेक विक्रम, ‘युनिव्हर्स बॉस’लाही सोडलं मागे

Subscribe

भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना चितगाव येथे सुरू आहे. या सामन्यात ईशान किशनने शतक झळकावत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. इशानचे हे पहिलेच वनडे शतक आहे. त्याच्या करिअरच्या ९ व्या सामन्यात त्याने पहिले शतक झळकावले आहे. तसेच ८५ चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत त्याने १५ चौकार आणि २ षट्कार मारले आहेत.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला असून सलामीवीर शिखर धवनला स्वस्तात तंबूत पाठवले. धवनला केवळ ३ धावा करता आल्या. पण त्यानंतर विराट कोहली आणि इशान किशन यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत बांगलादेशी गोलंदाजांची धुलाई केली.

- Advertisement -

२४ वर्षीय युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला पहिल्यांदाच बांगलादेश दौऱ्यावर खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेत ८५ चेंडूत शतक झळकावले. शतक झळकावरत त्याने ‘युनिव्हर्स बॉस’लाही मागे सोडलं आहे. किशनने १२६ चेंडूत द्विशतक पूर्ण केले. गेलने १३८ चेंडूत द्विशतक झळकावले आहे.

इशान किशनने १०३ चेंडूत १५० धावा पूर्ण केल्या आहेत. सोबतच त्याने वीरेंद्र सेहवागचा विक्रमही मोडला. सेहवागने इंदूर येथे वेस्ट इंडिजविरुद्ध ११२ चेंडूत १५० धावा पूर्ण केल्या होत्या. किशनला या सामन्यात द्विशतक झळकावण्याची मोठी संधी आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Fifa World cup: कतारमध्ये अमेरिकन क्रिडा पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -