घरIPL 2020IPL 2020 : बॅड न्यूज! दिल्लीचा गोलंदाज ईशांत शर्मा आयपीएलमधून आऊट 

IPL 2020 : बॅड न्यूज! दिल्लीचा गोलंदाज ईशांत शर्मा आयपीएलमधून आऊट 

Subscribe

यंदाच्या स्पर्धेत ईशांतला दुखापतींनी सतावले होते.

दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना मुकावे लागणार आहे. यंदाच्या स्पर्धेत ईशांतला दुखापतींनी सतावले होते. या स्पर्धेसाठी युएईत दाखल झाल्यावर सराव करताना त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो केवळ एकच सामना खेळू शकला. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने तीन षटकांत २६ धावा खर्ची केल्या होत्या आणि त्याला विकेटही मिळवता आली नाही. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. आता तो स्पर्धेतूनच बाहेर झाला आहे.

नव्या गोलंदाजाच्या शोधात 

‘दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला ७ ऑक्टोबर २०२० रोजी सराव सत्रात गोलंदाजी करताना दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला आयपीएल २०२० च्या उर्वरित सामन्यांत खेळता येणार नाही,’ अशी माहिती दिल्ली कॅपिटल्स संघाने दिली. यंदा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झालेला ईशांत हा दिल्लीचा दुसरा गोलंदाज आहे. याआधी लेगस्पिनर अमित मिश्रा हाताला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्याच्या जागी दिल्लीने बदली खेळाडू घेतला नव्हता. मात्र, ईशांतची जागा घेण्यासाठी दिल्लीचा संघ नव्या गोलंदाजाच्या शोधात असल्याची माहिती आहे. कागिसो रबाडा वगळता दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांना यंदा चांगला खेळ करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे ईशांतच्या अनुभवाची दिल्लीला कमतरता भासू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -