ISL 2018 : मुंबई सिटीचा सलामीचा सामना आज

इंडियन सुपर लीग (आयएसएल) च्या पाचव्या मोसमात आज मुंबई सिटी फुटबॉल क्लबचा पहिला सामना आज जमशेदपूरशी होणार आहे.

सौ - DNA
इंडियन सुपर लीग (आयएसएल) च्या पाचव्या मोसमात आज मुंबई सिटी फुटबॉल क्लबचा पहिला सामना आज जमशेदपूरशी होणार आहे. हा सामना अंधेरीतील मुंबई फुटबॉल अरिनामध्ये होणार आहे. आयएसएलच्या पाचव्या मोसमासाठी मुंबईने संघात बरेच बदल केले आहेत. त्यामुळे संघाकडून चाहत्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत.

नवा मोसम, नवे प्रशिक्षक, नवे खेळाडू 

मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग सुरू झाल्यापासून चांगले प्रदर्शन केलेले नाही. यापूर्वी मुंबईच्या संघात सुनील छेत्री, निकोलस अनेलका, दिएगो फोर्लान यासारखे मातब्बर खेळाडू असूनही मुंबईने आयएसएलच्या एकाही मोसमात सातत्यपूर्ण प्रदर्शन केलेले नाही. पण यावर्षी मुंबईने नव्या प्रशिक्षकाची निवड केली आहे. पोर्तुगीज हॉर्गे कोस्टा यांची मुंबईने प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. तर मुंबईने नव्या खेळाडूंनाही संघात घेतले आहे. मिडफिल्डर मोडू सोगोऊ आणि स्ट्रायकर राफेल बासटोस यांच्या येण्याने मुंबईचा संघ अधिक चांगला झाला आहे. भारताचा गोलकीपर अमरिंदर सिंग याचासुद्धा मुंबईच्या संघात समावेश आहे.