घरक्रीडाISSF World Championships : नेमबाजपटू ह्रदय हजारिकाला सुवर्णपदक

ISSF World Championships : नेमबाजपटू ह्रदय हजारिकाला सुवर्णपदक

Subscribe

भारतीय नेमबाजपटूनीं आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आणखी एक सुवर्पणपदक आपल्या नावे केले असून हे पदक १० मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात भारताच्या ह्रदय हजारिकाने भारताला मिळवून दिले आहे.

साउथ कोरियाच्या चँगवून शहरात सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळाल असून हे पदक नेमबाजपटू ह्रदय हजारिका याने १० मी. एअर रायफल मेन ज्यूनियर नेमबाजी प्रकारात भारताला मिळवून दिले आहे. याआधी १० मी. एअर पिस्तुल प्रकारात ज्युनिअर गटात सौरभ चौधरीनेही भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होत.

वाचा – ISSF World Championships : सौरभ चौधरीची सुवर्णकामगिरी

अंतिम शूटऑफमध्ये विजय

१६ वर्षीय ह्रदयने पात्रता फेरीत अप्रतिम कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आणि आपलं पदक नक्की केलं. त्यानंतर अंतिम फेरीत इराणच्या अमिरसोबत शूटऑफमध्ये विजय मिळवत ह्रदयने सुवर्णपदक पटकावले तर इराणच्या अमिर मोहम्मदला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. तसेच सदर सामन्यात रशियाच्या शामाकोवला कांस्यपदक मिळाले आहे.

- Advertisement -

क्रिडामंत्री राज्यवर्धन यांनीही केले अभिनंदन

नेमबाजपटू ह्रदय हजारिकाने आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये केलेल्या अप्रतिम कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. भारताचे क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून एक पोस्ट करत सौरभचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -