घरIPL 2020IPL 2020 : रोहितच्या दुखापतीबाबत शास्त्रींना पूर्ण माहिती नसणे शक्यच नाही!

IPL 2020 : रोहितच्या दुखापतीबाबत शास्त्रींना पूर्ण माहिती नसणे शक्यच नाही!

Subscribe

रोहितला भारतीय संघात स्थान न मिळाल्याचे विरेंद्र सेहवागला आश्चर्य वाटले. 

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी भारताच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही संघांची घोषणा झाली. भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला तिन्ही संघांमध्ये स्थान मिळाले नाही. रोहितला १८ ऑक्टोबरला झालेल्या पंजाबविरुद्धच्या आयपीएल सामन्यात पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो चार सामने खेळू शकला नव्हता. मात्र, मंगळवारी झालेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याचे मुंबईच्या संघात पुनरागमन झाले. त्यामुळे रोहितची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मग असे असतानाही रोहितला भारतीय संघात स्थान न मिळाल्याचे विरेंद्र सेहवागला आश्चर्य वाटले.

तसेच रोहितला संघात स्थान द्यायचे की नाही, हा निर्णय केवळ निवड समितीचा आहे, असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. मला रोहितच्या दुखापतीविषयी फारशी माहिती नसल्याचेही ते म्हणाले होते. मात्र, यात तथ्य नसल्याचे सेहवागला वाटते. रवी शास्त्री यांना रोहितच्या दुखापतीबाबत पूर्ण माहिती नसणे शक्यच नाही. शास्त्री हे निवड समितीचा भाग नसले, तरी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची निवड करण्याआधी निवड समितीने शास्त्री यांच्याशी चर्चा केली असणार, असे सेहवाग म्हणाला.

- Advertisement -

‘मी निवड समितीचा भाग नाही,’ असे शास्त्री जरी म्हणत असले तरी मी त्यांच्याशी सहमत नाही. ते अधिकृतरीत्या नसतील, पण संघाची निवड करण्याआधी निवड समिती कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्याशी चर्चा करतेच. एखादा खेळाडू फ्रेंचायझीसाठी खेळण्यास तयार असताना त्याची राष्ट्रीय संघात निवड होत नाही, याचे मला आश्चर्य वाटते. तो खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असेल, तर त्याची भारतीय संघात निवड झालीच पाहिजे, असेही सेहवागने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -